Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे. या मालमत्तेसाठी अनेक जणांनी बोली लावल्याचंही पाकिस्तानी वृत्त पत्र डॉननं (Dawn) म्हटलंय. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर या विक्रीतून पाकिस्तानचा फायदा होणार नसेल तर विक्री करण्यात येणार नाही. पाकिस्तानी दूतावासाच्या वॉशिंग्टनमध्ये दोन इमारती आहेत. सध्या दूतावासाचं कामकाज 2000 साली बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीतून चालतं. त्यासोबतच 1950 साली बांधण्यात आलेली दुतावासाची जुनी इमारतही आहे. नेमकी हीच इमारत विक्रीला काढण्यात आल्याचं पुढे आलं आहे. (Pakistan sells old embassy building in US due to financial crisis and crunch economic situation international news in marathi)


इमारतीची स्थिती काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1950 मध्ये बांधलेली ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. इमारत दूतावासाच्या मालकीची असल्यानं त्यावर मालमत्ता कर द्यावा लागत नाही. पण जो कोणी ही इमारत विकत घेईल त्याला मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर भरावा लागणार आहे. सुरूवातीला इमारतीचं नुतनीकरण करण्याचा विचार झाला होता. त्यावर होणारा खर्च आणि विक्रीतून होणारा फायदा यावर सारासार विचार झाल्याचं डॉन या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. 


इमारती विकण्याची वेळ का आलीय?


पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Financial Crisis) दिवसेंदिवस बिकट होत आहे. आयएमएफ आणि मित्र राष्ट्रांनी दिलेल्या खैरातीवर पाकिस्तानचा आर्थिक गाडा कसा बसा हकला जातो आहे. पाकिस्तानची परकीय चलनाची गंगाजळी जेमतेम 6 अब्ज डॉलर आहेत. त्यात देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या वर गेला आहे. नुकत्याच सिंध आणि बलुचिस्तानात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे त्या भागातलं कृषी उत्पन्नही बुडालं आहे. त्यामुळे मध्य आशियातील पाकिस्तानचे मोजके मित्र आणि चीन यांच्या आर्थिक खैरातीवर सध्या पाकिस्तान तरला आहे.गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्ताननं रशियाकडे भारताप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीवर सवलत मिळावी यासाठी हात पसरले. पण रशियानं ही मदत स्पष्टपणे नाकारली म्हणूनच आता पाकिस्तानवर दुतावास विकण्याची वेळ आल्याचं दिसतं आहे.