Pranjali Awasthi: वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध करण्यासाठी जर तुम्हाला उदाहरण हवे असेल तर प्रांजली अवस्थीला नक्की भेटा. भारतीय वंशाच्या या यूएस-आधारित कोडरने वयाच्या सातव्या वर्षी प्रोग्रामिंग सुरू केले. वयाच्या 13 व्या वर्षी एका संशोधन प्रयोगशाळेत इंटर्नशिप केली आणि अवघ्या 16 व्या वर्षी स्वतःचे एआय स्टार्टअप - डेलव्ह.एआय - लाँच केले. प्रांजलीची कहाणी ऐकून भलेभले तोंडात बोटं घालतात. कसा सुरु झाला तिचा प्रवास? ती नेमकं काय करते? जाणून घेऊया.
जगभरातील महिला प्रत्येक क्षेत्रात अडथळे पार करुन यशाची पुनर्परिभाषा करतायत. प्रांजली अवस्थी त्या बदल घडवणाऱ्यांपैकी एक आहे. मुली केवळ मोठी स्वप्ने पाहत नाहीत तर त्या चिकाटी, प्रतिभा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक दृष्टीकोन ठेवून ते साध्य करतायत हे तिने सिद्ध करुन दाखवलंय. प्रांजलीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने 2019 ते सप्टेंबर 2021 पर्यंत डोरल अकादमी चार्टर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. जिथे तिने स्टेम-केंद्रित अभ्यासक्रमाद्वारे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्यूटर सायन्स विषयात बॅचलर ऑफ सायन्स (बीएस) करत आहे.
प्रांजलीचा प्रवास हा आवड आणि संधीचा एक अद्भुत संगम आहे. तिचा जन्म भारतात झाला आणि ती 11 वर्षांची असताना फ्लोरिडाला गेली. तिचे वडील, एक कॉम्प्युटर इंजिनीअर असून त्यांनी तिला कोडिंगसाठी प्रोत्साहन दिले. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत तिच्या स्टार्टअपची किंमत सुमारे 100 कोटी रुपये म्हणजेच सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स झाली. इतक्या लहान वयात तिची चिकाटी, प्रतिभा आणि दूरदृष्टी याचे हे फलित आहे.
प्रांजलीने जानेवारी 2022 मध्ये मियामीमध्ये Delv.AI ची स्थापना केली. याद्वारे संशोधन सोपे करणे हे तिचे उद्दीष्ट आहे. हे AI-संचालित प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक कंटेट, PDF आणि अनेक डॉक्यूमेंट्समधून माहिती काढण्यास आणि सारांशित करण्यास मदत करते. हा प्लॅटफॉर्म एकाच वेळी अनेक फायली शोधू शकतो. क्लाउड ड्राइव्हशी कनेक्ट होऊ शकतो आणि यूजर्स त्यांचे निकाल CSV फाइलमध्ये एक्सपोर्ट करू शकतात. यात फ्री आणि पेड असे दोन्ही वर्जन आहेत.
इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय.
Delv.AI ने लोकप्रियता मिळवली आहे आणि बॅकएंड कॅपिटल आणि व्हिलेज ग्लोबल सारख्या गुंतवणूकदारांसह सुमारे $450,000 (₹3.89 कोटी) निधी उभारला आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत त्याचे मूल्यांकन सुमारे ₹100 कोटी आहे. संशोधक Delv.AI च्या प्लॅटफॉर्मचे कौतुक करतायत. यामुळे पुन्हा करावे लागणारे रिसर्चचे काम 75% पर्यंत कमी होते. शैक्षणिक किंवा तांत्रिक प्रयत्नांमध्ये बराच वेळ आणि ऊर्जा वाचवते.
यापूर्वी प्रांजलीने अप्सिलॉन पाई एप्सिलॉन येथे कार्यशाळेचे प्रमुख म्हणून काम केलंय. फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्वार्ट्झ सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स येथे रिसर्च इंटर्न म्हणून काम केलंय. ती डॅशची सह-संस्थापकदेखील आहे. प्रांजली आता तिच्या पुढील मोठ्या प्रोजेक्ट, 'डॅश'वर काम करतेय. ती त्याला "हातांचा चॅटजीपीटी" असे म्हणते. डॅश गप्पा मारण्यासोबत कामदेखील करते.
GER
135/9(20 ov)
|
VS |
TAN
108/2(13 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 192/4
|
VS |
MAW
120/7(20 ov)
|
Tanzania beat Malawi by 72 runs | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 144/8
|
VS |
GER
145/5(16.4 ov)
|
Germany beat Malawi by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.