प्रिन्सेस डायनांचा मृत्यू कार अपघातात, तरीही ब्रिटीश राजघराणे कधीच कारचा सीटबेल्ट का लावत नाहीत?

British Royal Family: ब्रिटिश राज घराण्यांना एका नियमातून सूट मिळाली आहे. पण नेमके कारण काय? जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 24, 2025, 03:24 PM IST
प्रिन्सेस डायनांचा मृत्यू कार अपघातात, तरीही ब्रिटीश राजघराणे कधीच कारचा सीटबेल्ट का लावत नाहीत?
Prince william and kate middleton why british royal family do not wear seat belt

British Royal Family: प्रत्येक देशात कार चालवण्यासाठी वेगवेगळे नियम असतात. कार चालवताना नेहमी सीटबेल्ट लावावा असा नियम आहे. हे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. जर नियम पाळले नाही तर दंडदेखील ठोठावण्यात येतो. तसंच, अपघात घडल्यानंतर सीटबेल्ट असल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता कमी असते. पण तुम्हाला माहितीये का ब्रिटिश रॉयल्स सीट बेल्ट वापरत नाहीत. याचे कारण तुम्हाला माहितीये का?

ब्रिटिश सिक्युरिटी एक्सपर्य मायकल चँडलर यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत अखेर प्रिन्स विलियम आणि केट मिडलटनसह संपूर्ण ब्रिटिश रॉयल फॅमिली सीट बेल्टचा वापर का करत नाही हे सांगितलं आहे. प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू कार अपघातात झाला होता. तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलं की, जर डायना यांनी सीट बेल्ट वापरला असता तर त्यांचा जीव वाचण्यांची शक्यता 80 टक्के होती. 

चँडलर यांनी म्हटलं आहे की, ब्रिटिश रॉयल्स सुरक्षेच्या कारणास्तव सीट बेल्ट वापरत नाहीत. आपातकालीन स्थितीत ते रॉयल फॅमिलीला या प्रसंगातून कसे बाहेर काढतील याबाबत सिक्युरिटी ऑफिसरने विचार करावा.  या व्यतिरिक्त रॉयल फॅमिलीला अनेक हाय प्रोफाइल इव्हेंडमध्ये सहभागी व्हावे लागते. त्यासाठी त्यांना मिलिट्री युनिफॉर्म परिधान करावा लागतो. अशावेळी कारमधील सीटबेल्ट त्यांच्या युनिफॉर्मवर सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळं त्यांचा लूक खराब होऊ शकतो. 

चँडलर यांनी हे देखील सांगितले की, राजघराण्याला सीट बेल्ट न लावल्याबद्दल कायदेशीर कारवाईपासून पूर्णपणे सूट आहे. अशातच सीट बेल्ट न घातल्यास त्यांना कोणत्याही प्रकारच्या शिक्षेचा सामना करावा लागत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)