GK : एक असा प्राणी, जो मानेने घालतो अंड, कॅमेऱ्यात कैद झाला दुर्लक्ष क्षण

निसर्ग असंख्य अद्भुत चमत्कारांनी भरलेला आहे. प्रत्येक जीव वेगळा अन् त्या जीवाचा शारीरिक संबंध ठेवण्याची पद्धत वेगळी. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 16, 2025, 07:36 PM IST
GK : एक असा प्राणी, जो मानेने घालतो अंड, कॅमेऱ्यात कैद झाला दुर्लक्ष क्षण

निसर्गात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्या सामान्य डोळ्यांना दिसलेल्या नाहीत. असाच एक दुर्मिळ प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये एका प्राण्याने चक्क मानेमधून अंडी घातली आहेत. या सगळ्या प्रकाराने शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. 

न्यूझीलंडमधील एका दुर्मिळ गोगलगायीचे पहिल्यांदाच मानेतून अंडी घालण्याचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. हा अत्यंत दुर्मिळ क्षण संवर्धन विभागाच्या (DOC) एका कर्मचाऱ्याने नोंदवला. डीओसीने त्यांच्या फेसबुक पेजवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 'पॉवेलिफंटा ऑगस्टा' ही मोठी मांसाहारी गोगलगाय अंडी घालताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंडच्या साउथ आयलंडमधील कोळसा खाणकामामुळे पॉवेलीफांटा ऑगस्टा लोकसंख्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या वन्य अधिवासातून हलवून थंड कंटेनरमध्ये हलवण्यात आले. २००६ पासून होकिटिकामध्ये बंदिवान असलेल्या या लोकसंख्येचे व्यवस्थापन डीओसी करत आहे.

"पॉवेलिफांटा ऑगस्टाच्या बंदिस्त व्यवस्थापनामुळे केवळ ही प्रजाती नामशेष होण्यापासून वाचली नाही तर जगात इतरत्र आढळणाऱ्या या अविश्वसनीय प्राण्यांच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी देखील मिळाली आहे," असे डीओसी म्हणाले. ते इतके मोठे होऊ शकतात की, न्यूझीलंडचा संवर्धन विभाग त्यांना "गोगलगायींच्या साम्राज्याचे राक्षस" म्हणतो.

व्हिडिओ येथे पहा

"या गोगलगायींची काळजी घेण्यात आम्ही घालवलेल्या सर्व काळात, पहिल्यांदाच एखाद्या गोगलगायीला अंडी घालताना पाहिले आहे," असे संवर्धन रेंजर लिसा फ्लॅनागन म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, जेव्हा आम्ही गोगलगायीचे वजन करत होतो तेव्हा आम्हाला दिसले की ती अंडी घालत होते.

त्यांनी सांगितले की, पॉवेलीफंटा ऑगस्टा ही हळूहळू वाढणारी आणि दीर्घकाळ जगणारी गोगलगाय आहे.  ८ वर्षांचे होईपर्यंत लैंगिकदृष्ट्या प्रौढ होत नाहीत. हा प्राणी वर्षातून फक्त ५ मोठी अंडी घालतो, ज्यातून अंडी बाहेर पडण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.