जगातील 'या' महाशक्तिशाली देशाला सापडला 'पांढऱ्या सोन्याचा' सर्वात मोठा खजिना! किंमत 46208043000 रुपये; चीनला धोका

जगातील एका शक्तिशाली देशात 'पांढऱ्या सोन्याचा' सर्वात मोठा खजिना सापडला आहे. या शोधामुळे चीनला जबरदस्त झटका बसला आहे. जाणून घेऊया पांढरे सोनं नोमकं आहे तरी काय? 

वनिता कांबळे | Updated: Mar 26, 2025, 12:03 AM IST
जगातील 'या' महाशक्तिशाली देशाला सापडला 'पांढऱ्या सोन्याचा' सर्वात मोठा खजिना! किंमत 46208043000 रुपये; चीनला धोका

Lithium Found in US  : अमेरिकन शास्त्रज्ञांनी पांढरे सोनं अर्थात लिथियमचा प्रचंड साठा शोधून काढला आहे. कॅलिफोर्नियाच्या साल्टन समुद्राच्या गढूळ पाण्याखाली हा मौल्यवान खजिना सापडला आहे. याचे मूल्य 540 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके असू शकते. अमेरिकेत सापडलेल्या या खजिन्यामुळे चीनला जबदस्त झटका बसणार आहे. या धातूसाठी चीनचे वर्चस्व यामुळे धोक्यात येणार आहे. 

लिथियमचा प्रचंड साठा हा अमेरिकेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. मात्र, हा खजिना काढताना अमेरिकेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.   ज्याचा स्थानिक समुदाय, पर्यावरण आणि भू-राजकीय परिदृश्यावर परिणाम होऊ शकतो. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या इम्पीरियल काउंटीमध्ये स्थित साल्टन समुद्र हा बऱ्याच काळापासून आकर्षणाचा आणि चिंतेचा विषय आहे. एकेकाळी पर्यटकांसाठी लोकप्रिय असलेले हे सरोवर गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत आहे.
साल्टन समुद्राच्या पृष्ठभागाखाली जगातील सर्वात मोठ्या लिथियम ब्राइन साठ्यांपैकी एक आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 18 दशलक्ष टन लिथियम साठा आहे. हे आधी पुष्टी केलेल्या साठ्याच्या 40 लाख टनांपेक्षा खूपच जास्त आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. यामुळे ईव्ही बॅटरी उद्योगाला अधिक बळकटी मिळणार आहे. यामुळे 38.2 अब्ज इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी पुरेसे लिथियम उपलब्ध होऊ शकते. 
 कॅलिफोर्निया विद्यापीठातील रिव्हरसाइड येथील प्राध्यापकांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले. रिव्हरसाइड हे लिथियम साठ्याचे संशोधन करणाऱ्या पथकाचे प्रमुख आहेत. हा जगातील सर्वात मोठ्या लिथियम ब्राइन साठ्यांपैकी एक आहे. यामुळे अमेरिका लिथियमच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल आणि चीनकडून  लिथियम आयात करण्याची गरज पडणार नाही.