Veryovkina Cave Deepest cave in world : पृथ्वीवर अनेक रहस्यमयी गुहा आहेत. अशीच एक गुहा आहे जी इतकी खोल आहे की यात 30 कुतुबमिनार सामावतील. अतिशय थरारक अशी ही गुहा पाहिल्यावरच लोकांना धडकी भरते. या गुहेची खोली पाहून ही गुहा म्हणजे पाताल लोकात जाणारा रस्ता असल्याचेही अनेकजण म्हणतात. जाणून घेऊया ही गुहा कुठे आहे.
व्हेरोव्हकिना गुहा ( Veryovkina Cave) असे या गुहेचे नाव आहे. रशियाजवळील अबखाझिया प्रदेशातील पर्वतांमध्ये ही गुहा आहे. क्रेपोस्ट आणि जॉन्ट पर्वतांच्या मध्ये असलेली ही गुहा अंदाजे 2,212 मीटर म्हणजेच अंदाजे 2.2 किमी इतकी खोल आहे. या गुहेत 30 कुतुबमिनार शकतात. यावरुनच या गुहेच्या खोलीचा अंदाज लावता येतो.
1968 मध्ये क्रास्नोयार्स्क शहरातील काही स्पेलिओलॉजिस्टनी ही गुहा पहिल्यांदा शोधली होती. येव्हा गुहेची खोली 115 मीटर पर्यंत मोजली होती. 1986 मध्ये, मॉस्कोहून आलेल्या एका नवीन मोहिमेत या गुहेची खोली 440 मीटर इतकी होती. 2015 पासून, पेरोवो-स्पेलियो ग्रुपच्या शास्त्रज्ञांनी अनेक नवीन मोहिमा राबवल्या आहेत आणि 2018 मध्ये या गुहेची 2212 मीटरची विक्रमी खोली शोधण्यात यश आले.
या गुहेत सुमारे 6000मीटर लांबीचा एक भूमिगत बोगदा सापडला आहे. ही गुहा पृथ्वीच्या मध्यभागी सर्वात जवळ घेऊन जाते असे शास्त्रज्ञांचा दावा आहे. फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न यांच्या 1864 च्या प्रसिद्ध पुस्तकात "जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ" मध्ये या गुहेचे काल्पनिक रुप पहायला मिळतेय. मात्र, व्हेरिओव्हकिना गुहा पुस्तकात असलेल्या या काल्पानिक गुहेचे वास्तविक रुप आहे.
आजही या गुहेत अनेक नवीन संशोधन सुरू आहेत. शास्त्रज्ञ या गुहेची आणखी नव नविन रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गुहा निसर्गाची एक अद्वितीय निर्मिती आहे. या गुहेमुळे पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार आहेत.