Solar Coronal Heating: अंतराळात अनेक रहस्य दडली आहेत. याचाच शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांकडून करण्यात येत आहे. अलीकडेच भारताने चांद्रयान-2 ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर इस्रोने सूर्यमोहिमेची आणखी केली. आदित्य एल या मोहिमेतून इस्त्रो सूर्याचा आभ्यास करणार आहे. त्यापूर्वीच सूर्यासंबंधीत एक महत्त्वाची बातमी समोर येते.
सूर्यासंबंधी एक रहस्य असे आहे जे अद्याप उलगडले नाहीये. सूर्याच्या बाहेरील आवरण ज्याला कोरोना असं म्हटलं जातं. जे सूर्याच्या खालच्या थरांपेक्षा जास्त उष्ण का आहे? याला कोरोनोल हिटिंग प्रोब्लेम, असं म्हटलं जातं. वैज्ञानिकांना अद्याप या प्रश्नाचे उत्तर सापडले नाहीये. मात्र, आत्ताच झालेल्या एका संशोधनातून वैज्ञानिकांना त्याचे उत्तर सापडू शकेल असं म्हटलं जातंय.
हवाईमध्ये पृथ्ववरील सर्वात शक्तीशाली दुर्बीण डेनियलच्या इनॉय सोलर टेलीस्कॉपच्या माध्यमातून अनेक देशातील वैज्ञानिकांच्या टीमने सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे तपशीलवार निरीक्षण केले. त्यांना सूर्याच्या खालील बाजूस असलेल्या वातावरणात क्रोमोस्फियरमध्ये चुंबकीय क्षेत्रामध्ये सापाच्या आकाराचे ऊर्जा नमुने आढळले आहेत. यामुळंच सूर्याच्या वातावरणाच्या बाह्य स्तरांवर उर्जा वितरीत करतात, असं शास्त्रज्ञांचे मत आहे. ब्रिटनमधील शेफील्ड विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट्स एडर्ली यांनी म्हटलं आहे, या संशोधनामुळं आपण सूर्य हा ग्रह समजून घेण्याच्या आणखी एक पाऊल पुढे जात आहोत.
सूर्याच्या वातावरणातील कोरोनल हिटिंगने अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. सूर्याचे बाहेरील आवरणाचे तापमान 1 दशलक्ष अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून शकते. तर सूर्याच्या पृ्ष्ठभागावरील तापमान 6 हजार अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
Did you know the most powerful #solar telescope in the world uses cameras made by a company in Northern Ireland? Its resolving power is so strong it's the equivalent to seeing a 50p coin in Manchester from London.
Our researchers have harnessed this power to discover new… pic.twitter.com/F8Lk63lL6P
— Queen's University Belfast (@QUBelfast) October 19, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. युरोपियन स्पेस एजन्सीने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात सूर्याच्या आत एक सापासारखी गोष्ट सरपटताना दिसत आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या मते, सरपटणारी गोष्ट ही सौर लहर असू शकते. ही लाट स्फोटांनी बनलेली आहे. शास्त्रज्ञांनी याला Serpent Inside Sun असे नाव दिले आहे. शा सौर लहरींसाठी सूर्याचे चुंबकीय क्षेत्रही कारणीभूत असल्याचे मानले जाते. लहरींच्या निर्मितीदरम्यान तापमानात चढ-उतार होत असतात आणि या चढउतारांमुळे अशा लहरी निर्माण होतात, असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं होतं.