जखमी सैनिकांना लवकर बरं करण्यासाठी Sex Therapy. भेटायला येणाऱ्या तरुणींचा खर्च सरकारचा

जगात वेगवेगळ्या रोगांवर लोकं वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतात. परंतु यातील काही रोगांवरील उपचार वादात आहेत.

Updated: Apr 20, 2021, 03:22 PM IST
जखमी सैनिकांना लवकर बरं करण्यासाठी Sex Therapy. भेटायला येणाऱ्या तरुणींचा खर्च सरकारचा

इस्रायल : जगात वेगवेगळ्या रोगांवर लोकं वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतात. परंतु यातील काही रोगांवरील उपचार वादात आहेत. जसे, काही महिला गर्भधारणेनंतर स्वत: चा प्लेसेंटा (Placenta) खातात. या मागे त्यांचे असे म्हणणे आहे की, यामुळे गर्भधारणेची कमजोरी दूर होते. आणि पुढच्या गर्भ धारणेच्यावेळी त्यांना त्रास होत नाही. परंतु ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळेच अशा प्रकारचे उपचार विवादात येतात.

सेक्स थेरपीही जगात प्रसिद्ध आहे. परंतु ही थेरपी देखील वादात आहे.

इस्रायल सैनिकांना ही थेरपी दिल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. एका मीडिया रीपोर्टनुसार, इस्रायलमधील सैनिकांना देण्यात येणारी सेक्स थेरपीचा खर्च इकडची सरकार करते.

जखमी सैनिकांवर उपचार

बर्‍याच देशांमध्ये रुग्णांसाठी सेक्स थेरपी वापरली जाते. यात थेरपीत आजारी व्यक्तीबरोबर आणखी एक व्यक्ती ठेवली जाते. ज्यामुळे रुग्णाची लैंगिक क्षमता वाढवण्यात मदत होते. ही एक वादात असलील थेरपी आहे. परंतु तरीही, इस्राईलमधील अनेक जखमी सैनिकांना ही थेरपी दिली जात आहे. युद्धामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर हे सैनिक रुग्णालयाच्या पलंगावर पडले आहेत. आता त्यांना बरे करण्यासाठी सेक्स थेरपी दिली जात आहे. या थेरपीचा खर्च इस्त्राईल सरकारकडून केला जात असल्याचं बीबीसीने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

सेक्स थेरपी म्हणजे काय?

इस्त्रायल सेक्स थेरपिस्ट रोनित अलोनी यांनी या थेरपीबद्दल सांगितले आहे. या थेरपीत रूग्णाच्या खोलीत एक बेड, सीडी प्लेयर आणि कामुक पेंन्टींग भिंतींवर लावल्या जातात. युद्धात जखमी झाल्यानंतर लैंगिक क्षमता गमावलेल्या सैनिकांना ही थेरपी दिली जाते. थेरपीमध्ये, रुग्णांना पुन्हा सेक्स करणे शिकवले जाते. ज्यामुळे त्यांच्यात उर्जा वाढते आणि काही कालांतराने ते पुन्हा युद्ध लढण्यास सज्जं होतात.

थेरपी जोरदार प्रतिकूल आहे

काही रीसर्चनुसार ही थेरपी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. या थेरपीमुळे बरेच सैनिक लवकर बरे होतात. पण बरेच लोक याला विरोध करत आहेत. ते म्हणतात की, ही थेरपी वैश्यवृत्ती सारखी आहे.त्यामुळे त्यावर बंदी घालावी. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरकार या थेरपीसाठी जाणार्‍या मुलींना पैसे देते. या थेरपीची आजकाल बरीच चर्चा होत आहे.