NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!

Space News : नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेकडून आजवर अनेक अवकाश मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र यात एक अशीही मोहिम होती, ज्यामुळं संपूर्ण जगावर धोक्याचं सावट पाहायला मिळालं होतं.   

सायली पाटील | Updated: Dec 2, 2025, 02:55 PM IST
NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!
shocking nasa project a119 america plan to nuke moon sputnik cold war secret mission read details

Space News : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अशा अनेक संकल्पना आहेत, ज्या संकल्पनांनी संशोधकांनासुद्धा भारावलं आहे. याच अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जगातील विविध अंतराळ संशोधन संस्थांनी कैक स्तरांवर संशोधनपर मोहिमा आखल्या. नासा, ही अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थासुद्धा यात मागे राहिली नाही (NASA Mission). 

Add Zee News as a Preferred Source

Sputnik-1 उपग्रह आणि ती मोहिम... 

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोवियत संघ अर्थात रशियामध्ये 1950 च्या दशकामध्ये जणू अवकाशातही युद्ध सुरू होतं. अवकाशात आपला देश यशस्वी मार्गावर पुढे जायला हवा असंच प्रत्येकाला वाटत होतं. ज्यादरम्यान 1957 सोवियत संघानं Sputnik-1 नावानं पहिला उपग्रह पाठवला आणि अमेरिकेला मोठा धक्का दिला. ज्यामुळं रशिया चंद्रावरही आपल्याआधी पाऊल ठेवेल असाच अमेरिकेचा समज झाला. याच भीतीनं अमेरिकेतील काही संशोधक आणि वायुदलानं एक मोठी योजना आखली. 

अमेरिकेच्या या घातक मोहिमेचं नाव होतं, Project A119. या मोहिमेअंतर्गत अमेरिकेनं चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब पाठवण्याची तयारी केली. या बॉम्बमुळं होणाऱ्या स्फोटाची तीव्रता अणूबॉम्बहून अधिक घातक ठरते. या स्फोटानंतर चंद्रावर मोठा हादरा बसून प्रचंड उर्जा निर्माण होईल आणि तो पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला पाहता येईल असा अमेरिकेचा समज होता. या माध्यमातून अमेरिका हा देश सर्वात शक्तिशाली असेल असा संदेश पोहोचून कोणीही देशाला आव्हान देणार नाही अशी महासत्तेची धारणा होती. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात 'खटारा' कार आज ठरतीये 'क्लासिक आयकॉन'; 35 वर्षांनंतर रस्त्यांवर का अवतरली ही रुपवती?

वरील योजना फत्ते करण्यासाठी शास्त्रज्ञ लेनर्ड राइफल आणि त्यांच्या टीमनं 1958 ते 1959 पर्यंतचा अहवाल तयार केला. बॉम्ब चंद्राच्या त्या भागावर फोडण्याचा बेत आखण्यात आला जिथं उजेड आणि अंधार एकत्र येतो. या रेषेला टर्मिनेटर लाईन असं म्हणतात, जेणेकरुन या स्फोटातून अधिक उर्जा निर्माण करण्याचा हेतू होता. ही मोहिमच अतिशय घातक असल्यानं आणि पृथ्वीलाही तिच्यापासून धोका असल्यानं अखेर मोहिमेला पूर्णविराम देण्यात आला. स्फोटानंतर चंद्राचे तुकडे पृथ्वीवर कोसळून त्याचा मानवी जीवनापासून निसर्गावर वाईट परिणाम होईल अशी भीती संशोधकांनाही असल्यानं ही मोहिम तिथंच सोडण्यात आली. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More