पृथ्वीपासून 88 किमी उंचावर NASA ला अंतराळातून काय दिसलं? पृथ्वीवर त्राहिमाम पाहून संशोधकही हादरलेले

NASA Space News : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अशी ओळख असणाऱ्या नासाकडून सातत्यानं मैलो दूर असणाऱ्या या अंतराळ विश्वावर नजर ठेवण्याचं काम सुरू असतं.   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2026, 11:55 AM IST
पृथ्वीपासून 88 किमी उंचावर NASA ला अंतराळातून काय दिसलं? पृथ्वीवर त्राहिमाम पाहून संशोधकही हादरलेले
space news NASA saw mesosphere waves in space after helen storm in florida 88 km above earth fear unlocked

NASA Space News : ISS अर्थात 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'वर सक्रिय असणाऱ्या आणि सातत्यानं पृथ्वीसह अवकाशात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या NASA नं आणखी एकदा सर्वांना हैराण करणारी माहिती दिली आहे. ज्यामध्ये पृथ्वीवर येणारं वादळ किंवा तत्सम वातावरणीय स्थितीचा फक्त भूपृष्ठावरच नाही तर थेट अंतराळातही परिणाम होत असल्याची माहिती अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नं जारी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

वादळाचा धोका आणि पृथ्वी...

सप्टेंबर 2024 मध्ये फ्लोरिडावर 'हेलेन' नावाचं चक्रीवादळ धडकलं होतं. ज्यामुळं तयाक झालेल्या या परिस्थितीची दाहकता अंतराळातूनही दिसली ज्यामध्ये या वादळामुळं आकाशात 88 किमी उंचीपर्यंत विचित्र लाटावजा कंपनं तयार झाली. प्रत्यक्ष भूपृष्ठावरून जे पाहता आलं नाही, ती भयावह दृश्य नासाच्या अवकाशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कॅमेराच्या मदतीनं टीपण्यात आली. नासानं मेसोस्फीयरमध्ये या लाटा टीपण्यात आल्या. 

मेसोस्फीयरमध्ये हा आभाळातात असणारा तिसरा असा थर आहे जो प्रत्यक्षात जमिनीपासून 50 ते 85 किमी दूरपर्यंत विस्तारलेला आहे. ज्यामुळं आता हवामानात होणारे बदल फक्त पृथ्वीवरी भूपृष्ठालाच नव्हे, तर संपूर्ण वातावरणाच्या थरातही परिणाम करून जातात हे स्पष्ट होत आहे. 

अंतराळातून पृथ्वीवरील वादळ कसं दिसलेलं? 

फ्लोरिडात जेव्हा हेलेन चक्रीवादळ धडकलं होतं तेव्हा अंतराळात नासाच्या एका खास कॅमेरानं हवेत दिसणाऱ्या अजस्त्र लाटा टीपल्या होत्या. पाण्यात दगड टाकल्यास ज्याप्रमाणे लाटांसारखी रचना तयार होते, तरंग निर्माण होतात अगदी तशीच रचना इथं दिसली होती. नासानं 2023 मध्ये ISS बाहेर एक अशी यंत्रणा बसवली होती, ज्याला AWE असं म्हटलं गेलं. आभाळात अतिशय उंचीवर विविध वायूंमधून निघणारी एक हलकी लकाकी टीपणं आणि त्यावर लक्ष ठेवण्याचं काम ही यंत्रणा करते. 

हेसुद्धा वाचा : बाssssपरे! मुंबईहून दुप्पट मोठा हिमखंड नष्ट होतोय; अवकाशातून Photo टीपत NASA कडून धोक्याचा इशारा

 

या लाटांचा नेमका अर्थ काय?

सदर दृश्य संशोधकांनाही  घाबरवणारी होती. मात्र नासानं त्याबाबतच स्पष्टीकरण देत पृथ्वीवर आलेलं वादळ इतकं भयंकर होतं, की त्यातून एक नवी उर्जा निर्माण झाली आणि तिथपर्यंत पोहोचली जिथं पृथ्वीच्या सीमा संपून अंतराळाचं विश्व सुरू होतं. या लाटा फक्त वादळप्रभावित क्षेत्रापुरताच सिमीत राहिल्या नसून पश्चिमेला पुढे सरकू लागल्या होत्या. ज्यामुळं वादळाचा तडाखा प्रत्यक्षा एका विस्तीर्ण क्षेत्रावर पडल्यातंही स्पष्ट झालं. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More