Earth Magnetic Field : पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि यातूनच या ग्रहावर सजीवसृष्टी कशा पद्धतीनं जन्मास आली यासंदर्भातील कैक मोठे खुलासे आतापर्यंत संशोधकांनी केले आहेत. यातच आता एका महत्त्वाच्या संशोधनाची भर पडली असून, काहीसं चिंतेत टाकणारं वृत्त समोर आलं आहे. हे वृत्त आहे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासंदर्भातलं. पृथ्वीच्या चुंबकीय कवच(Magnetic Field) क्षेत्राचा एक भाग असाही आहे जो अतिशय कमकुवत असल्याचं म्हटलं जातं.
अटलांटिक महासागरावर असणाऱ्या या भागाला दक्षिण अटलांटिक विसंगती किंवा SAA असंही म्हणतात. ज्यामध्ये आता काही संरचनात्मक बदलांची नोंद करण्यात आली असून, ते पूर्वेकडे सरकताना दिसत आहेत. ESA अर्थात युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेकडून यावर लक्ष ठेवलं जात असून, 2014 पासून त्यासंदर्भातील बरीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे पृथ्वीचं तेच चुंबकीय क्षेत्र आहे, जे सुरक्षा कवच म्हणून काम करत अंतराळातून येणाऱ्या धोकादायक किरणोत्सर्गापासून (Radiation) मानवाचा आणि जीवसृष्टीचा बचाव करतं. प्रत्यक्षात पृथ्वीवर SAA नजीक हे कवच विरळ होत असून, त्यामुळं तिथं उपग्रह आणि अवकाशयानांतून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा धोका अधिक संभवतो.
ESA च्या निरीक्षणानुसार पृथ्वीवरील फक्त हाच भाग नाही, तर आता हे क्षेत्र दक्षिण आफ्रिकेकडेही तयार होत असून, त्यामुळं हे कवच दुभंगत असल्याचं स्पष्ट होत आहे. किंबहुना हा नवा भाग अमेरिकेनजीक असणाऱ्या केंद्राच्या तुलनेत अधिक बिघडत असून, दक्षिण अटलांटिक विसंगती क्षेत्रात चुंबकीय लहरींची विचित्र संरचना पाहायला मिळत आहे.
सोप्या शब्दांत सांगावं तर, ही ती क्षेत्र आहेत जिथं चुंबकीय रेषा विचित्र संरचनेत व्यवहार करताना दिसत असून, त्या बाहेर निघण्याऐवजी पृथ्वीच्या केंद्राकडेच आकर्षित होतात. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये होणाऱ्या हालचालींना वेग आल्यामुळं या प्रक्रियेस वेग मिळाल्याचं तज्ज्ञ सांगतात.
इंडी100 नुसार अद्यापही या चुंबकीय क्षेत्रातील फ्लक्स पॅच आफ्रिकेच्या वरील भागाच्या दिशेनं जात असून, SAA लासुद्धा आपल्या दिशेनं आकर्षित करत आहे. या विचित्र स्थितीमुळं आता त्यांचा एकंदर व्यवहार लक्षात घेण्य़ासाठी वैज्ञानिक मॉडेल असणं महत्त्वाचं आहे.
भूपृष्ठावर वास्तव्य करणाऱ्यांना याचा थेट धोका नसला तरीही अवकाळातील कामजावर मात्र याचा परिणाम होताना दिसेल असं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये अधिर उर्जेच्या किरणांच्या संपर्कात आल्यानं विद्युत उपकरणं निकामी होऊ शकतात, बरीच माहिती निकामी ठरू शकते आणि काही काळानंतर उपग्रहसुद्धा अकार्यक्षम ठरण्याची भीती असते. त्यामुळं आता संशोधकांकडून यावर नेमका कोणत्या मार्गानं तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दक्षिण अटलांटिक विसंगती (SAA) म्हणजे काय?
SAA ही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील एक कमकुवत भाग आहे, जो मुख्यतः दक्षिण अटलांटिक महासागरावर स्थित आहे. हे क्षेत्र पृथ्वीच्या गाभ्यातील द्रव धातूच्या हालचालींमुळे निर्माण होते, ज्यामुळे चुंबकीय रेषा सामान्यपेक्षा कमी तीव्रतेच्या असतात.
SAA मध्ये 2014 पासून कोणते बदल झाले आहेत?
2014 पासून ESA च्या Swarm मिशनने SAA चा विस्तार आणि कमकुवतपणा वाढल्याचे निरीक्षण केले आहे. हे क्षेत्र युरोप खंडाच्या अर्ध्या आकाराएवढे वाढले आहे (सुमारे 1% पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या).
SAA चा पृथ्वीवरील जीवसृष्टी आणि मानवांना धोका आहे का?
भूपृष्ठावर राहणाऱ्या जीवांना आणि मानवांना SAA चा थेट धोका नाही, कारण पृथ्वीचे वातावरण अंतराळातील विकिरणांपासून पुरेसे संरक्षण करते. मात्र, अंतराळवीरांना (उदा. ISS वर) विकिरणाचा धोका वाढतो, ज्यामुळे डीएनएचे नुकसान किंवा कर्करोगाची शक्यता असते, तरीही त्यांचा वेळ मर्यादित असल्याने जोखीम कमी आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
WI
(37.4 ov) 98/6 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.