Road Accident Romania Mercedes Viral Video: तुम्ही आतापर्यंत रस्त्यावरील अपघाताचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असतील. मात्र रोमानियामध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये एक अती प्रचंड वेगाने धावत असलेली कार नियंत्रण सुटल्याने सिग्नलच्या चौकातून काही फुटांपर्यंत हवेत उडाली. ही उडालेली दोन गाड्यांवरुन थेट समोर जाऊन पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
अपघात झालेली कार मर्सिडीज कंपनीची असून चालक 55 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चौकातील फुटपाथच्या कठड्याला धडून काही फुटांपर्यंत उडवली आणि सिग्नलला थांबलेल्या अनेक गाड्यांवरून जात पलीकडे पडली. विशेष म्हणजे एवढा भीषण अपघात होऊनही कोणतीही जीवघेणी दुखापत न होता तो चमत्कारिकरित्या वाचला.
3 डिसेंबर रोजी झालेल्या या अपघाताचा थरार सिग्नलच्या चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वायव्येकडील ओराडिया शहरातील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर हा सारा प्रकार घडला. वेगाने येणाऱ्या मर्सिडीज ब्रेक निकामी झाल्यापासून अत्यंत वेगात चौकात घुसली. वळणाचा रस्ता असतानाही गाडी सरळ जाऊन फुटपाथच्या कठड्याला धडकून हवेत उडाली. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मर्सिडीज चालक चुकीच्या मार्गाने अत्यंत वेगात चौकात घुसला. एक बस निघून जाण्याची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन गाड्यांवरुन उडाली. नंतर पेट्रोल पंपापासून काही मीटर अंतरावर ही कार जमिनीवर कोसळली.
| En Roumanie, une Mercedes a littéralement survolé deux voitures après que son conducteur de 55 ans a perdu le contrôle en raison d’un problème médical. Malgré le choc spectaculaire, il a survécu avec des blessures modérées et a refusé d'être hospitalisé. pic.twitter.com/tFRRsAJVxV
— Cerfia (@CerfiaFR) December 5, 2025
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय चालकाला मधुमेहाचा त्रास असून अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने कारवरील नियंत्रण गमावले. त्यामुळेच कार अत्यंत वेगाने चौकात शिरली आणि अपघात झाला.
अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, मर्सिडीज अगदी काही क्षण दिसते इतका तिचा वेग असल्याचं दिसून येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, जवळच्या अपार्टमेंट ब्लॉकमधील रहिवाशांनी धडकेचा जोरदार आवाज ऐकल्याचे सांगितले. अपघातग्रस्त कारच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या ड्रायव्हरला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. चालकाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तातील साखर कमी झाल्याने चालक बेशुद्ध पडला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र तो चमत्कारिकरित्या वाचला.
पोलिसांनी 90 दिवसांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द केला आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.