Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ एका हट्टापायी सारं जग कोरोनाहून मोठ्या संकटात

Donald Trump : जगापुढं आहे एक मोठं संकट; काय आहे या संकटाचं स्वरुप? कसे असतील त्याचे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण जगासाठी देण्यात आलेला महत्त्वाचा इशारा...   

सायली पाटील | Updated: Oct 7, 2025, 12:32 PM IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ एका हट्टापायी सारं जग कोरोनाहून मोठ्या संकटात
Us america Tariff Have Created risk of Uncertainty than Covid Pandemic Warn Economist Erik Berglof

Donald Trump : मागील पाच वर्षांचा आढावा घेतला असता संपूर्ण जगापुढं अनेक संकटं असल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाची महामारी असो, युद्ध असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा देशादेशांमधील सीमावाद आणि तणावाची परिस्थिती असो. कैक आव्हानं जगापुढं उभी राहिली. काही प्रसंगी तणाव वाढला, हिंसाचाराला वाव मिळाला, महामारीनं रौद्र रुप धारण केलं आणि अनेकांचे बळीसुद्धा गेले. जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्यातच भरीस भर म्हणून आता या संकटांहूनही अधिक घातक संकट जगाच्या उंबरठ्यावर उभं असून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक हट्ट त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. मुख्य म्हणजे यामुळं भारतावरही परिणाम होणार असल्या कारणानं ही बाब सर्वांचच लक्ष वेधत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

खरंच कोरोनाहून मोठं संकट येणार? (Corona Pandamic)
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार त्यांनी लागू केलेले आयात शुल्काचे नियम आणि त्यामुळं ओढावलेली परिस्थिती ही कोरोनाच्या साथीहून अधिक घातक असल्याचा दावा 'एशियन  इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक (AIIB)'चे मुख्य अर्थतज्ज्ञ एरिक बर्गलोफ ( Erik Berglof ) यांनी केला आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळं कोविडहून अधिक मोठं वैश्विक संकट जागतिक स्तरावर प्रचंड मोठं संकट आणि अनिश्चिततेला वाव देऊ मिळू शकतं असे सूतोवाच त्यांनी केले. एका प्रतिष्ठीत माध्यम समुहानं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. 

भारतावर याचा काय परिणाम? 

एरिक बर्गलोफ यांच्या निरीक्षणानुसार आयातशुल्कासंदर्भातील निर्णयामुळं जगभरात मोठ्या प्रमाणात अस्थैर्य निर्माण होत असून, जगातील प्रत्येक राष्ट्रावर याचे परिणाम दिसून येत आहेत. कोणत्याही भूमिकेमुळं निर्माण झालेली अनिश्चितता यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती. ज्यामुळं सध्याच्या घडीला हे संकट कोविडची साथ आणि जागतिक आर्थिक संकटाहून मोठं असल्याचं म्हटलं जात आहे. 

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं गुंतवणूक आणि व्यापारातून मोठी मिळकत असेल. आर्थिक विकासावरही याचा परिणाम असेल. काही अनिश्चितता इथं कमी होतील मात्र अद्यापही जागतिक स्तरावर आपण पुढे जाण्याची गरज आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला सामोरं जाण्यासाठी चीननं बरीच तयारी केल्याचं सांगताना अमेरिका आणि इतर देशांमध्ये द्वीपक्षीय चर्चेचा परिणाम चीनवर होणार नाही याची निश्चिती केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. 

भारतावर कसा असेल परिणाम? 

बर्गलोफ यांच्या दाव्यानुसार आणि निरीक्षणानुसार बाजारात भारत भक्कम स्थानी दिसत असून परदेशी कंपन्यासुद्धा या देशात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवत आहेत. ज्यामुळं आशिया खंडात भारत सुस्थितीत असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या साऱ्यामध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या गरजांप्रती आर्थिक धोरणांमध्ये संवेदनशीलता राखली जाणं महत्त्वाचं असून त्याच माध्यमातून भारताचा फायदा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

FAQ

ट्रम्पांच्या आयात शुल्कामुळे कोविडहून मोठं संकट येणार का?
होय, AIIB चे मुख्य अर्थतज्ज्ञ एरिक बर्गलोफ यांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत कोविड महामारी किंवा 2008 च्या आर्थिक संकटापेक्षा अधिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

एरिक बर्गलोफ यांनी नेमकं काय म्हटलं?
बर्गलोफ यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या संरक्षणवादी धोरणांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता पूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. 

भारतावर याचा परिणाम काय होईल?
भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. टॅरिफ अनिश्चिततेमुळे भारताने आशियाई देशांसोबत व्यापार संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे गुंतवणूक वाढेल. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More