Trump नीति फसली! Tariff War च्या नादात अमेरिकेचं दिवाळं; पगाराशिवाय लोक करतायत नोकऱ्या, भारतीयांवर काय परिणाम?

US government shutdown 2025: भविष्यात अधिक गंभीर रुप धारण करणार हे संकट.... आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेची ही काय अवस्था? 

सायली पाटील | Updated: Nov 7, 2025, 02:41 PM IST
Trump नीति फसली! Tariff War च्या नादात अमेरिकेचं दिवाळं; पगाराशिवाय लोक करतायत नोकऱ्या, भारतीयांवर काय परिणाम?
us government shutdown financial crisis flights delayed know latest update in donald trumps country

US government shutdown 2025: सत्ताबदल, त्यानंतर धोरणात्मक बदल आणि आर्थिक महासत्ता म्हणून जगभरात ख्याती असणाऱ्या अमेरिकेची सुत्र पुन्हा हाती आल्यानंतर घेण्यात आलेले आयातशुल्कासह कैक निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घडामोडींपैकी एक असणाऱ्या अमेरिकेत सध्या 'सरकारी शटडाऊन'चा टप्पा आतापर्यंतच्या सर्वात भीषण वळणावर आला असून, आता याचा थेट परिणाम देशातील नोकरदार वर्ग आणि हवाई वाहतुकीवरही दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अमेरिकी परिवहन सचिव सीन डफी (Sean Duffy) यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार देशातील 40 विमानतळांवरील कार्यवाहीत 10 टक्क्यांनी घट करण्यातयेत आहे. शटडाऊनमुळं हजारो 'एअर ट्रॅफिक कंट्रोलर' आणि TSA अधिकारी पगाराशिवायच नोकरी करण्यास भाग पडले असून, नोकरदार वर्गामध्ये कपात झाल्यानं हवाई मार्गानं होणाऱ्या वाहतुकीमध्ये सुरक्षिततेचेही मोठे प्रश्न उपस्थित राहत आहेत. 

अमेरिकेतील सद्यस्थिती नेमकं काय सांगते? 

अमेरिकेतील सरकारी शटडाऊन आतापर्यंतचं सर्वात मोठं शटडाऊन असून, त्यास 36 दिवस पूर्ण झाले आहेत. देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शटडाऊन असल्याचं म्हचलं जात आहे. यापूर्वी 2018-19 मध्ये 35 दिवसांचं शटडाऊन झालं होतं. 
अमेरिकेत 'शटडाऊन' तेव्हा होतं, जेव्हा काँग्रेस (अमेरिकी संसद) आणि राष्ट्राध्यक्ष आगामी आर्थिक वर्षासाठीच्या खर्चास मंजुरी देणाऱ्या विधेयकावर सहमती दर्शवत नाहीत. ही परिस्थिती सहसा  डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन या दोन्ही गटांमध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे उत्पन्न होते. सध्या यामागे आरोग्य सेवांवरील अनुदान, विशिष्ट सरकारी कार्यक्रमांवर होणारा खर्च अशी कारणं सांगण्यात येत आहेत. कायदेशीररित्या सरकारी कोषातील पैसा कमी झाल्यास 'कमी आवश्यक' सेवा आणि विभाग बंद करण्यास सरकार भाग पडतं. तर, अत्यावश्यक सेवा सीमित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवल्या जातात. 

भारताच्या चिंतेत भर? 

सध्या अमेरिकेत सरकारी शटडाऊन सुरू असल्या कारणानं भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष अमेरिकेत नोकरीच्या निमित्तानं असणाऱ्या नोकरदार वर्गासमवेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनाही कैक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळं प्रामुख्यानं भारतातील IT आणि इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. आयात शुल्काचा निर्णयसुद्धा यात महतत्वाची भूमिका बजावत असून, आधीच तणावाचा सामना कराणाऱ्या व्यापारि संबंधांवरही हे शटडाऊन परिणाम करताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Explained : खरेदी खत तयार करण्याची प्रक्रिया काय? या टप्प्यानंतर पुढची प्रक्रिया समजून घ्या 

जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता राष्ट्र असणाऱ्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या अनिश्चिततेमुळं वैश्विक गुंतवणूकदारांच्या विश्वासाला हादरा बसला असून, त्याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटमध्ये आणि रुपयावरही दिसत आहे. यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांवरही परिणाम होत असून, डॉलरची मागणी वाढून रुपयावर आणखी ताण येऊ शकतो. 

कधी संपणार हे संकट? 

अमेरिकेतील हे संकट नेमकं कधी संपणार याबाबत कोणतीही शाश्वती नसून, राष्ट्रपती आणि काँग्रेस (अमेरिकी संसद) मधील कोणत्याही स्वरुपातील तडजोडीचे संकेत अथवा तारीख निश्चित नाही. ज्यामुळं कोणत्याही प्रकारचं हमीपात्र वक्तव्य सरकारच्या प्रतिनिधींकडूनही करण्यात येत नाही. 

FAQ

अमेरिकेतील सरकारी शटडाऊन म्हणजे काय?
सरकारी शटडाऊन तेव्हा होते जेव्हा अमेरिकी काँग्रेस (संसद) आणि राष्ट्राध्यक्ष आगामी आर्थिक वर्षासाठीच्या खर्च विधेयकावर सहमती गाठत नाहीत. यामुळे सरकारी कोषातील पैसा कमी होतो आणि 'कमी आवश्यक' सेवा व विभाग बंद होतात. 

सध्याचे शटडाऊन किती दिवस चालले आहे आणि ते का इतके मोठे आहे?
सध्याचे शटडाऊन 36 दिवस चालले असून, ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे. यापूर्वी 2018-19 मध्ये 35 दिवसांचे शटडाऊन झाले होते.

शटडाऊनचा अमेरिकेतील नोकरदार वर्ग आणि हवाई वाहतुकीवर कसा परिणाम होत आहे?
हजारो एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि TSA अधिकारी पगाराशिवाय काम करत आहेत. परिवहन सचिव सीन डफी यांच्या घोषणेनुसार, 40 विमानतळांवरील कार्यवाहीत 10% घट झाली आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More