सडपातळ आणि 2000 नंतर जन्मलेली; 35 वर्षांच्या प्रोफेसरला हवीय परफेक्ट गर्लफ्रेंड, अटी संपता संपेना...

Viral News : 1.16 कोटींचं पॅकेज, पस्तिशीतल्या प्रोफेसरच्या अटी पाहून नेटकऱ्यांनी डोकं धरलं... जगभरात होतेय याच प्रोफेसरची चर्चा.   

सायली पाटील | Updated: Mar 24, 2025, 11:28 AM IST
सडपातळ आणि 2000 नंतर जन्मलेली; 35 वर्षांच्या प्रोफेसरला हवीय परफेक्ट गर्लफ्रेंड, अटी संपता संपेना...
viral news 35 year old professor with more than 1 crore income mentions strict criteria for girlfriend

Viral News : प्रेमाचं नातं...हे एक असं नातं जिथं सहसा सर्व व्यवहार, फायदा, स्वार्थ हे सारंकाही मागे पडून फक्त भावनेला प्राधान्य दिलं जातं. पण, काही मंडळी मात्र इथंही अपवाद ठरतात. कारण, नात्यांच्या बाबतीतल ही माणसं फारच मोजमाप करणाऱ्या स्वभावाची असतात. अशाच एका प्रोफेसरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ज्यानं प्रेयसीच्या शोधात इतक्या अटी मांडल्या आहेत की, पाहणाऱ्यांनीसुद्धा डोकं धरलं आहे. 

Zhejiang University’s School of Marxism मध्ये असोशिएट प्रोफेसरपदी काम करणाऱ्या Lou नावाच्या या व्यक्तीनं 'मॅचमेकिंग चॅटरुम'मध्ये याच महिन्यात काही लक्षवेधी अटी मांडल्या. South China Morning Post नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं. जिथं त्यानं स्वत:चं वर्ण करताना आपलं वय 35 वर्षे असून उंची 175 सेंटीमीटर आणि वजन 70 किलो असल्याचं सांगितलं. आपण चीनच्या प्रतिष्ठीत विद्यापीठातून पीएचडीचं शिक्षण घेतलं असून वर्षभरात 1 मिलियन युआन म्हणजेच (1.16 कोटी रुपये) इतकी कमाई करतो असंही त्यानं सांगितलं. क्रीडा आणि गुंतवणूक क्षेत्रात विशेष आवड असल्याचं सांगत चीनच्या Yiwu, Zhejiang प्रांतातील एका सधन कुटुंबात आपला जन्म झाल्याचं त्यानं स्पष्ट केलं. 

स्वत:ची सपशेल माहिती देणाऱ्या पस्तिशीतल्या या तरुणानं त्याला नेमकी कशी प्रेयसी किंवा जोडीदार हवी याबाबतच्या अटी मांडल्या आणि इथंच तो काहीसा फसला असं म्हणायला हरकत नाही. आपली जोडीदार 2000 वर्षांनंतर जन्मलेली असावी, तिच्या आणि त्याच्या वयात किमान 10 वर्षांचा फरक असावा, तिची उंची 165 ते 171 सेंटीमीटर दरम्यान असावी...... इतकंच नव्हे तर 'ती' सडपातळ आणि चांगल्या प्रतिमेची असावी अशा साऱ्या अपेक्षा त्यानं जाहीरपणे मांडल्या. 

बरं या अपेक्षा इथंच संपल्या नाहीत. तर, शैक्षणित पात्रतेसाठी तिनं चीनमधील 9 प्रतिष्ठीत विद्यापीठांपैकी कोणा एका विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण रेलेलं असावं. अन्यथा जागतिक स्तरावर आघाडीच्या 20 विद्यापीठांपैकी कोणा एका विद्यापीठात शिक्षण घेणारी मुलगीसुद्धा चालेल, अशीही मागणी त्यानं इथं लिहिली. 

हेसुद्धा वाचा : MI च्या खेळाडूला धोनीकडून भर मैदानात 'बॅट ट्रीटमेंट'; सामना संपताच असं काय घडलं? 

अपेक्षांची भलीमोठी यादी देणाऱ्या या व्यक्तीची पोस्ट व्हायरल होत असून रोष ओढावताना पाहत Zhejiang University’s School of Marxism नं एक अधिकृत माहिती जारी करत आपला या व्यक्तीच्या पोस्टशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं. 'यामध्ये देण्यात आलेली काही माहिती चुकीची आहे' असं विद्यापीठानं स्पष्ट केलं. इथं नेटकऱ्यांनी या व्यक्तीचं डोकं ठिकाणावर आहे ना? असे प्रश्न करत त्याच्यावर कडाडून टीका केली. काहींनी तर आपल्याला शिक्षणाचीच किव येते... अशी उपरोधिक टीका करत या विचारसणीचाच विरोध केला.