Viral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम

Viral News : शाळा सोडून वयाच्या 17 वर्षीय या मुलगा महिन्याला 16 लाख रुपये कमवतोय. आईने क्रिसमसला दिलेल्या एका गिफ्टने त्याचा आयुष्याला कलाटणी दिली. 

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2024, 06:26 PM IST
Viral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम

Viral News : मूर्ती लहान पण किर्ती महान...असाच एक मुलगा वय वर्ष 17 पण हा महिन्याला 16 लाख रुपये कमवतोय. त्याच काम एवढं वाढलंय की, त्याने शाळा सोडून कामावर लक्ष केंद्रित केलंय. हा पठ्ठा ऑनलाइन काम करुन 16 लाख कमवतो. खरं तर डिजिटलच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे अनेक संधी सहज उपलब्ध आहे. या ऑनलाइनच्या जगात लहान मोठा अगदी वयाच बंधन नाही. तुमचे जितके जास्त फॉलोअर्स तितकी तुमची संपत्ती. कंटेंट निर्मिती आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आज अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शाळा सोडून 17 वर्षांचा हा मुलगा नेमकं करतो तरी काय? (Viral News Age 17 but earns 16 lakh rupees a month selling stickers online Caelan Mcdonald)

Add Zee News as a Preferred Source

काय आहे या मुलाचा व्यवसाय?

न्यूयॉर्क पोस्टनुसार, या 17 वर्षांच्या मुलाच नाव कैलिन मॅकडोनाल्ड असं आहे. तो एक ब्रिटीश मुलगा आहे. त्याचा आईच्या एका गिफ्टने त्याला श्रीमंत केलंय. होय, दोन वर्षांपूर्वी ख्रिसमससाठी 49 वर्षीय आई कॅरेल न्यूजहॅम हिने तिला सर्किट जॉय म्हणजे डिजिटल ड्रॉइंग, कटिंग आणि प्रिंटिंग मशीन गिफ्ट म्हणून दिली. यानंतर कैलिन मॅकडोनाल्ड आयुष्याला एक वेळीच कलाटणी मिळाली. त्याला ख्रिसमसमध्ये मिळालेल्या गिफ्टमधून संधीच सोनं केलं. त्याने या मशिनच्या सहाय्याने ऑनलाईन पैसे कमावयला सुरुवात केली. तो या मशिनद्वारे ट्रान्सफर प्रिंट्स तयार करतो. हे प्रिंट्स काचेच्या वस्तूंवर चिकटवली जातात. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर याचे हे ट्रान्सफर प्रिंट्स शेअर करण्यास सुरुवात केली. त्याला या कामातून पैसे मिळाल्या लागले.

सर्वातीला तो शाळेतून आल्यानंतर हे काम करायचं. पण आता त्याचा व्यवसायाचा आवाका एवढा वाढला की, त्याने आता शाळा सोडली आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी 200 हून अधिक वस्तू विकल्या. जुलै 2024 मध्ये शाळा सोडल्यानंतर, Kailyn ने एक मोठे प्रिंटर मशीन विकत घेतले. त्यानंतर त्याने TikTok शॉप आणि इतर प्लॅटफॉर्मवर 79,93,810 रुपयांचे स्टिकर्स आतापर्यंत विकले आहेत. Kaileen अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे स्टिकर्स विकून वर्षाला लाखो रुपये कमावतो.

काइलीन म्हणाला, 'माझ्या आईकडून मला मिळालेली ही सर्वात अप्रतिम ख्रिसमस भेट आहे, मला असे काही घडेल याची कल्पना नव्हती, हे सर्व अचानक घडले. जूनमध्ये मला वाटले, आपण प्रयत्न करू या, पण मला हे काम माहित नव्हतं. पण आता मी हिट झालो, आता मी इतका व्यस्त आहे की माझ्याकडे वेळ इतर गोष्टींसाठी वेळ नाही.'

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More