"नवऱ्यासोबत रोज 5 मिनिटं 'ते' करायला हवं", प्रसिद्ध मॉडेलच्या वक्तव्यानं खळबळ

मॉडल्स किंवा सेलेब्रिटी बऱ्याच वेळा असे काही विधान करुन जातात की, ज्यामुळे नंतर सर्वत्र चर्च सुरु होते.

Updated: Jul 29, 2021, 09:54 PM IST
"नवऱ्यासोबत रोज 5 मिनिटं 'ते' करायला हवं", प्रसिद्ध मॉडेलच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई : काही मॉडल्स किंवा सेलेब्रिटी बऱ्याच वेळा असे काही विधान करुन जातात की, ज्यामुळे नंतर सर्वत्र चर्च सुरु होते. काही वेळा हे विधान त्यांच्याकडून ओघात निघून जातात. तर काही वेळा काही सेलेब्रिटी हे असे विधान पब्लिसिटीसाठी करतात. सध्या अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल कॅप्रिस बॉरेटच्या (Caprice Bourret) अशाच एका विधानावरून खळबळ उडाली आहे. 

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कॅप्रिसने सेक्स आणि पती-पत्नीच्या नात्याबद्दल आपले मत दिले आहे. परंतु बहुतेक लोकांनी कॅप्रिसच्या या मताला पसंत केले नाही ज्यामुळे लोकं तिच्याव कडाडून टीका करत आहेत.

कॅप्रिसने सांगितले की, महिलांनी आपल्या नवऱ्याला कधीही संभोग किंवा सेक्स करण्यासाठी मनाई करू नये. त्याचबरोबर तिने महिलांना आपल्या नवऱ्याबरोबर दररोज सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे महिलांना आणि त्यांच्या नवऱ्याचा तणाव कमी होण्यास मदत मिळते असे देखील तिने सांगितले आहे.

OK  मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कॅप्रिस म्हणाली, "तुम्ही हे बोलू शकत नाही की, तुम्ही थकल्या आहात किंवा तुमचे डोके दुखत आहे. यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं काढावे लागतील."

दोन मुलांची आई कॅप्रिसने महिलांना कोणत्याही प्रकारे बेडरूमध्ये तक्रार करू नये असा सल्ला दिला आहे.

मॉडेल म्हणाली, "पुरुष खूप भोळे असतात. त्यांना संतुष्ट करणे खूप सोपे असते. आहार, स्तुती आणि सेक्सद्वारे तुम्हाला त्यांचे हृदय सहज जिंकता येते."

Morror.co.ukमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कॅप्रिस म्हणाली, "पहिल्या लॉकडाऊन दरम्यान मी खूप सक्रिय आणि क्रियेटिव्ह होते. परंतु दुसरा लॉकडाउन माझ्यासाठी तणावपूर्ण होता. ताणतणाव दूर करण्यासाठी सेक्स खूप उपयुक्त ठरला." ती म्हणाली की, लैंगिक संबंधाशिवाय नवराबायकोतील संबंध संपुष्टात येतात आणि आपण ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कॅप्रिस 2011 साली फायनान्सर Ty Comfortला भेटली होती, दोघांची भेट एका सामान्य मित्राद्वारे झाली. 2019 मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यांना जेट आणि जेक्स ही दोन मुले आहेत. कॅप्रिसने सांगितले की, लग्नानंतर तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.

मॉडेलच्या या मुलाखतीवर बरीच टीका होत आहे. लोकांनी तिच्या या मताला विरोध केला आहे. तर ब्रिटनचे सुप्रसिद्ध पत्रकार बेल मूनी यांनी सांगितले की, आतापर्यत महिलांना देण्यात आलेला हा सर्वात निरुपयोगी सल्ला आहे.