US Man Claims Dog Shot Him Viral News: गोळीबार केल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र, अमेरिकेत अविश्वसनीय अशी घटना घडली आहे. पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने माणसीावर गोळी झाडली आहे. हा विचित्र प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. हे प्रकरण सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
अमेरिकेतील एका खाजगी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. पिटबुल या कुत्र्याच्या मालकानेच कुत्र्याने कोळी झाडल्याचा दावा केला आहे. मी बेडवर झोपलो होतो. यावेळेस बंदुकीचा आवाज आला आणि गोळी माझ्या शिरिरावर लागली. माझ्या पिटबुल या कुत्र्यानेच माझ्यावर गोळी झाडल्याचा दावा या वयक्तीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गेला आहे. कुत्र्याने माझ्यावर गोळी झाडली असा या व्यक्तीचा दावा पाहून पोलिसही चक्रावले आहे.
पोलिसांनी या व्यक्तीची तक्रार दाखल करुन घेतली. कुत्रा काय कोणताही प्राणी गोळी झाडू शकत नाही असे पोलिसांनी सांगितले. मात्र, या व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कुत्र्याचा चुकून बंदुकीवर पाय पडून ट्रिगल दबला जाऊन बंदुकीतुन गोळी सुटली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान कुत्र्याने मालकावर गोळी झाडल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या बातमीवर अनेक मिम्स बनले असून ते देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावर अनेक चित्र विचित्र तसेच गमतीशीर कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कुत्र्याने गोळीबार करणे हे अशक्य असल्याचे म्हंटले आहे. तर, ही बातमी खोटी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मालकाने जेवण दिले नसेल म्हणून कुत्र्याने त्याला गोळी घातली अशी मजेशीर कमेंटही काही लोकांनी केली आहे.