फॅशन शो म्हटलं की तिथे रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात. सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण येथे मॉडेल्स एकमेकींना चक्क चिखलात लोळवत होत्या. हे पाहिल्यानंतर अनेकांना नेमकं काय सुरु आहे हे समजत नव्हतं. 


चिखलात लोळत, भांडणाऱ्या मॉडेल्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये मॉडल्स चिखलात लोळत ऐलेना वेलेजच्या नव्या कलेक्शनचं प्रदर्शन करत होत्या. यादरम्यान त्या चिखलात लोळत होत्या आणि एमेकींनाही लोळवत होत्या. हे पाहिल्यानंतर जणू काही त्या भांडत आहेत असंच वाटत होतं. कारण त्या पूर्णपणे चिखलात माखल्या होत्या. 


वेलेजने तिच्या स्प्रिंग/समर 2024 कलेक्शनचं प्रदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या बुशविकमधील एका सामान्य गोदामात फॅशन शो आयोजित केला होता. अनेकांच्या कल्पनेपासून हे दूर होते. त्यामुळे मॉडेलन्सना चिखलात लोळताना पाहिल्यानंतर हे कोणतंही भांडण नसून, थीम आहे हे समजण्यास त्यांना उशीर लागला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by DietSabya® (@dietsabya)


या अजब फॅशन शोमधील एक व्हिडीओ Instagram वरील @DietSabya या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी मॉडेल्सचा घोळका चिखलात एकमेकींना धक्काबुक्की करत असून लोळवताना दिसत आहेत. पण त्या फक्त भांडण झाल्याचं किंवा लोळतानाचा अभिनय करत आहे हे तिथे उपस्थित प्रेक्षकांना समजण्यास उशीर लागला. गर्दीतील अनेक प्रेक्षकांनी तर मोबाईल काढून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली होती. 


पोस्टच्या कॅप्शनमध्ये, @DietSabya ने लिहिलं आहे की, "न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये वेलेजने फॅशन जगातील स्थितीवर उपहासात्मकपणे परिपूर्ण भाष्य आहे." ही पोस्ट शेअर करण्यात आल्यानंतर अनेकांनी लाईक केलं आहे. पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत. 


एका युजरने गंमतीत म्हटले की, "हे लोक रेस्तराँचे बिल कोण भरणार यावर भांडत आहेत". तर दुसरा म्हणाला की, "दिल्लीच्या सरोजिनी बाजाराचे रोजचे दृश्य". तिसऱ्याने लिहिले आहे "याची काय गरज होती? इथे काय चालले आहे?"