बापरे! 380 फूट उंच धबधब्यावर महिलेचा खतरनाक स्टंट, 2 दिवसात Video ला 2 करोड Views
केवळ एका व्हिडिओसाठी एका महिलेने खतरनाक स्टंट केला आहे, या व्हिडिओवरुन नेटिझन्समध्येच वाद निर्माण झाला असून काही जणांनी तिचं कौतुक केलं, तर काही जणांनी टीका केली आहे
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ (Video) वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी एका महिलेने तब्बल 380 फूट उंच धबधब्यावर (Water Fall) खतरनाक स्टंट केला आहे. केवळ दोन दिवसात तब्बल 2 करोड लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. या व्हिडिओवरुन नेटिझन्समध्येही (Netizen) वाद निर्माण झाला आहे. काही जणांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काही जणांनी या महिलेवर जोरदार टीका केली आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
झाम्बिया-झिम्बाब्वे सीमेवर (Zambia-Zimbabwe Border) व्हिक्टोरिया नावाच एक धबधबा (Victoria Waterfall) आहे. जगातील सर्वात उंच धबधब्यांमध्ये याची गणना होते. या धबधब्यावर एका मुलीने खतरनाक स्टंट (Stunt) केला असून याची जगभरात चर्चा होत आहे. 380 फूट उंचीवरुन वेगाने पाणी कोसळतंय, अशा या धबधब्याच्या टोकावर झोपून या मुलीने व्हिडिओ बनवला आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रचंड वेग असतानाही या मुलीचं संतुलन जराही बिघडलेलं नाही, अगदी आरामत ती धबधब्याच्या कडेला पहुडलेली दिसतेय.
व्हिडिओला 2 कोटी व्ह्यूज
या व्हिडिओत एरिअल शॉट्सही दाखवण्यात आले आहेत, यावरुन हा धबधबा किती धोकादायक आहे याचा अंदाज लावता येईल. कमकुवत हृदयाचा माणून त्या धबधब्याच्या जवळही जाण्याचा विचार करणार नाही. पण त्या मुलीने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होत आहे. तिच्याबरोबर असलेल्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात तब्बल 2 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओवरुन नेटिझन्समध्ये वाद
काही लोकांनी या मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं असलं तरी काही जणांनी या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्या मुलीच्या पायांकडचा भाग व्हिडिओत दाखवण्यात आलेला नाही, यावरुन त्या मुलीचे पाय कोणीतरी घट्ट पकडले असावेत किंवा तिच्या पायांना रश्शीने बांधण्यात आलं असावं असं काही युजर्सने म्हटलं आहे. एका युजर्सने म्हटलंय व्हिडिओ पाहूनच इतकी भीती वाटते, तर तिथे गेल्यावर काय होईल. तर एका युजरने म्हटलंय अशा खतरनाक स्टंटसाठी या महिलेवर कारवाई केली गेली पाहिजे.
जगातील उंच व्हिक्टोरिया धबधबा
झाम्बिया-झिम्बाब्वे सीमेवर व्हिक्टोरिया धबधब्याचं नाव ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. या धबधब्याची उंची जवळपास 380 फूट इतकी आहे. जगातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेल्या व्हिक्टिरिया धबधबा नयनरम्य आणि तितकाच धोकादायक मानला जातो.