Video Mexico President Claudia Sheinbaum : जागतिक स्तरावर आजही महिला हक्कांचं उल्लंघन होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरच असल्याची घटना नुकतीच घडल्याचं समोर आलं. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातसुद्धा महिलांवर होणारे अत्याचार हा मुद्दा किती गंभीर आहे हेच व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून सिद्ध होत आहे. हा व्हिडीओ आहे जागतिक स्तरावरील राजकारणात महत्त्वाच्या हुद्द्यावरील महिला नेत्यासोबत झालेल्या हादरवणाऱ्या कृत्याचा.
मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाऊडिया शीनबाम यांच्याशी कथित स्वरुपात एका मनसिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या पुरुषानं भर रस्त्यात गैरवर्तन आणि अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मेक्सिको सिटीतील ऐतिहासिक डाऊनटाऊन परिसरात ही घटना घडली असून, सोशल मीडियावरही त्या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे, तर अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित करून जात आहे.
राष्ट्रपती शीनबाम ज्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या समर्थकांसमवेत संवाद साधत होत्या त्याचवेळी नशेत असणारी एक व्यक्ती (पुरुष) त्यांच्या नजीक आली आणि त्यांनी शीनबाम यांना स्पर्श करत त्यांना Kiss करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांनं राष्ट्रपतींना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी तातडीनं त्यांचे अंगरक्षक पुढे आले आणि त्यांनी या व्यक्तीला दूर लोटलं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये राष्ट्रपतींच्या जवळ येऊ पाहणारा पुरुष त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करताना दिसत आहे. सुरुवातीला सामान्य नागरिक काही संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ येऊ पाहत आहे असाच भास त्यांच्या अंगरक्षकांना झाला. मात्र त्यानं त्यानं केलेलं कृत्य आणि ओलांडलेल्या सर्व मर्यादा पाहून अंगरक्षकही हादरले. किंबहुना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पाहिल्यानंतर शीनबाम यांनाही धक्काच बसला. मात्र त्यांनी क्षणात परिस्थिती सावरून नेली.
BREAKING: Man tries to kiss, touch Mexico President Claudia Sheinbaum during public greeting. pic.twitter.com/JE1T1tC49R
— Insider Paper (@TheInsiderPaper) November 4, 2025
BBC नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपला विनयभंग करण्याचा प्रकार यापूर्वीही घडला असून, त्यावेळी आपण राष्ट्रपती पदावर नव्हतो ही कटू आठवण शीनबान यांनी उजेडात आणली. सदर प्रकरणी रितसर तक्रार केली जाणार असून, हा अनुभव फक्त मला नाही तर माझ्या देशातील इतर महिलांनाही आल्याचं त्या म्हणाल्या. 'आता तक्रार केली नाही, तर दुसऱ्या मेक्सिकन महिलांचं काय होणार? जर एका महिला राष्ट्रपतींशी (ते) असं वागू शकतात तर, देशातील इतर महिलांचं काय?' असा बोचरा आणि या राक्षसी मानसिकतेवर घाला घालणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यामुळं पुन्हा एकदा महिला हक्क, त्यांची सुरक्षितता हे सर्व मुद्दे गांभीर्यानं चर्चेच येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.