Baba Vanga Predictions on Gold 2026: 2026 वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोनं चांदीच्या किमंतीचा भडका उडाला आहे. 30 दिवसात चांदी तब्बल एक लाख रुपयांनी महाग झाली आहे. तर, सोन्याच्या दरातही 15 ते 20 हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. अशातच प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमीताबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून सर्वानाच धक्का बसला होता. बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. यामुळे गोल्ड मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे.
सोन्याच्या किमतींबाबत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बाबा वेंगाने सोन चांदीच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोन्याच्या किमतीत लक्षणीय तेजी दिसून आली आहे. देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सोन्याच्या किंमतीत प्रचंड दरवाढ झाली असून सातत्याने ही दरवाढ सुरुच आहे. बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचे दिसत आहे. भू-राजकीय संघर्ष, आर्थिक समस्या आणि शेअर बाजारातील चढउतारांमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता, अनेक गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे आकर्षित करत आहे. गेल्या 10 वर्षांत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी खरेदी केलेल्या सोन्याचे प्रमाणही वाढले आहे. एकूण जागतिक कर्ज अंदाजे 337 ट्रिलियन डॉलर आहे. जे जगाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. जागतिक कर्जातील वाढीमुळे बाजारात एक मोठा बुडबुडा तयार होत असल्याची भीती निर्माण झाली आहे, जो फुटला तर आणखी एक आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.
गुंतवणूकदार सोन्याला कमी जोखीम असलेली सुरक्षित गुंतवणूक मानतात. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने आता अनेकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बाबा वांगाच्या भाकिता लक्षात घेता, बहुतेक जण ऐतिहासिक आकडेवारीच्या आधारे सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होईल का असा अंदाज लावत आहेत. बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला, कमकुवत अमेरिकन डॉलर आणि ग्रीनलँड संकटामुळे वाढत्या तणावामुळे सुरक्षित-निवासी मागणीमुळे ही वाढ झाली. सुरक्षित-निवासी मागणीमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने, स्पॉट सोन्याच्या किमतींनी पहिल्यांदाच प्रति औंस 4,800 डॉलरचा टप्पा ओलांडला. चांदीच्या किमती देखील प्रति औंस 100 डॉलरच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 46 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 50 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.