जगाचा अंत झालाच, तर ‘या’ ठिकाणी असेर ‘रिस्टार्ट’चं बटण, कुठे आहे ही गुप्त जागा?

जगाचा अंत झालाच आणि सर्व सृष्टीची उलथापालथ झाली, तर हे जो कोणी शेवटचा वाचणार तेव्हा हे एक ठिकाण देणार पुनर्निर्माणाला वाव...

Updated: Jan 21, 2026, 04:38 PM IST
जगाचा अंत झालाच, तर ‘या’ ठिकाणी असेर ‘रिस्टार्ट’चं बटण, कुठे आहे ही गुप्त जागा?
What will happen post end of the world what is doomsday vault know the details behind its formation

World News : जगाचा अंत अमुक एका वर्षी होणार, तमुक एका पद्धतीनं होणार या आणि अशा अनेक चर्चा, बातम्या, माहितीपर लेख किंबहुना या मुद्द्यावर आधारित चित्रपटही अनेकांनीच पाहिले असतील. पण, याच जगाचा एक भाग असाही आहे, जो खरंच हा अंत झाला तर पुन्हा एकदा नव्यानं एक आयुष्यच उभं करण्यास, सृष्टीचक्र सुरु करण्याच मोलाची भूमिका बजावणार आहे. साऱ्या धकाधकीपासून, गर्दीपासून आणि प्रकाशझोतापासून दूर असणारं हे ठिकाण पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या कुशीत असून, संपूर्ण जगासाठी एक आशेचा किरण आहे. जिथं जगातल्या सर्वात मौल्यवान गोष्टी सांभाळून ठेवण्यात आल्या आहेच. ज्यातून सृष्टीचीच पुननिर्मिती होणार आहे..

Add Zee News as a Preferred Source

आर्क्टिक वर्तुळात येणाऱ्या एका हिमाच्छादित पर्वतावर, उत्तर ध्रुवावर असणाऱ्या या ठिकाणाचं मानवी आयुष्यात असणारं महत्त्वं अनन्यसाधारण असून इथं काय साठवलं जातंय माहितीये? खनिज, तेल, रत्न? नाही.... इथं साठवल्या जात आहेत धान्य आणि शेतपिकांच्या बिया. ऐकण्यात किंवा वाचण्यात तुमचा गोंधळ होत नाहीये, हे खरंच घडतंय.

जगभरातून जवळपास 930,000 पद्धतीच्या धान्यांचं बी- बियाणं स्पिट्सबर्गन येथील ‘ग्लोबल सीड वॉल्ट’मध्ये ठेवण्यात आलं आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर एका अर्थी हे जगाचं रिस्टार्ट बटण असून, एक प्रकारची अशी पेटी आहे ज्यामध्ये जगातील सर्वात मोठी कृषी क्षेत्रातील जैवविविधता जपून ठेवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, या पृथ्वीवरील 13000 वर्षांपूर्वीचा कृषी क्षेत्रातील इतिहास या इमारतीमध्ये जतन करण्यात आला आहे.

का निवडलं हेच ठिकाण?

स्वालबार्डहून दुसरं कोणतंही ठिकाण या इमारतीसाठी योग्य नव्हतं. ही एक अशी जागा आहे, जिथं जगाच्या अखेरच्या टोकावर विमानानं पोहोचता येतं. या इमारतीला ‘डूम्सडे वॉल्ट’ असंही म्हणतात. ही एक प्रकारची तिजोरीवजा इमारत उत्तर ध्रुवानजीक ठेवण्यात आली आहे, जिथं कायमच तापमान प्रचंड कमी असतं. हे एक असं ठिकाण आहे, जिथं जगात काहीही घटना घडली, तरीही ही तिजोरी मात्र सुरक्षितच राहील.

हेसुद्धा वाचा : कोणकोणत्या देशांकडे आहेत चांदीचे मोठे साठे अन् सर्वाधिक उत्पादनक्षमता? भारत 'या' यादीत कितव्या स्थानी?

2008 मध्ये ही तिजोरी तयार करण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत या तिजोरीत बी- बियाणं ठेवण्यासाठी 100 हून अधिक देशांनी पुढाकार घेतला. ज्या देशांना त्यांच्या शेतपिकांचं बी- बियाणं इथं ठेवायचं असतं त्यांनी एक करार करणं अपेक्षित असतं. ही तिजोरी त्या देशांसाठी बँकेतील लॉकरप्रमाणं काम करते. अगदी तसंच ज्याप्रमाणे नागरिक त्यांचे दागदागिने, मौल्यवान गोष्टी बँक लॉकरमध्ये सांभाळून ठेवतात. यासाठी देशांना ठराविक किंमतही मोजावी लागते बरं. थोडक्यात काय, तर जगासाठी हे एक पुनर्निर्माणाचं ठिकाण असून, अनेकांसाठी आजही एक मोठं रहस्यच आहे. 

About the Author