US-Iran War Latest News : युद्धाचा उल्लेख झाला की रक्तरंजित दृश्य, निष्पाप बळी, शस्त्रास्त्रांचा मारा अशीच चित्र समोर येतात. शत्रुत्वाची परिसीमा गाठल्यानंतर भडकणारा वणवा म्हणजे युद्ध. सध्या जगभरात आखाती देशांमधील तणावासह इराण- अमेरिकेतील युद्धानं चिंता वाढवलेली असतानाच दोन आठवड्यांच्या युद्धविरामानं किमान दिलासा मिळाला. मात्र युद्धाच्या निमित्तानं चर्चा सुरू आहे एका अशा युद्धाची जे लढण्यासाठी शस्त्रच वापरली गेली नाहीत. मग हे युद्ध झालं तरी कसं?
यूनाइटेड नेशंन्सच्या रीजनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर वेस्टर्न यूरोपच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कॅनडाच्या एल्समियर आणि ग्रीनलँड बेटांदरम्यान 1200 चौरस मीटरचं एक लहानसं बेट असून, त्याचं नाव आहे हान्स आयलंड, जे या दोन्ही बेटांपासून समान अंतरावर आहे. मात्र कॅनडा आणि डेन्मार्क, दोघांकडून या बेटावर हक्क सांगितला जात होता.
Hans Island चं कॅनडा आणि डेन्मार्कपासूनचं अंतर होतं 18 किमी. ज्यामुळं हे दोन्ही देश कायदेशीर तत्त्वांवर या बेटावर हक्क सांगू शकत होते. जिथं कॅनडानं आधीच या बेटावर दावा ठोकला होता, तिथं डेन्मार्कनं या भूमिकेचा विरोध केला. 1973 मध्ये या दोन्ही देशांत एक करार झाला. ज्यानुसार बेटाच्या एका टोकावर पाण्याची रेष आखत कॅनडा आणि डेन्मार्कची सीमा सुरू होईल असं ठरलं. Hans Island वर कोणाचाच हक्क नसेल असा निष्कर्ष काढत या तणावावर संगनमतानं तह करण्यात आला.
1984 मध्ये व्हिस्की वॉर सुरु झालं. त्यावेळी कॅनडानं या बेटावर आपला ध्वज फडकवला आणि कॅनडियन व्हिस्कीची एक बाटली तिथं ठेवली. या कृतीला उत्तर देत डेन्मार्कच्या ग्रीनलँडमधील परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनाडाच्या ध्वजाऐवजी डेन्ममार्कचा ध्वज लावत तिथं डॅनिश श्रॉप्सची बाटली ठेवली. सोबत एक पत्रही लिहिलं, 'डेन्मार्कमध्ये आपलं स्वागत आहे', असं त्या पत्रावर लिहिलं. यानंतर पुढील कैक वर्षे हे दोन्ही देश Hans Island वर आपला हक्क या वेगळ्या मार्गानं सांगत राहिले. गोळ्या, शस्त्रांचा वापर इथं झालाच नाही मात्र व्हिस्की वॉर इथं सुरूच राहिलं.

2005 पर्यंत हा विचित्र संघर्ष सुरू राहिला आणि अखेर Hans Island वर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश पुढे सरसावले. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू झाली आणि 2022 मध्ये एकमत झालं. ज्यामध्ये या बेटाचा अर्धा भाग डेन्मार्कचा असेल आणि अर्धा भाग कॅनडाचा असेल असं ठरलं. जून 2022 मध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलॉनी जॉय आणि डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री जेप्पे कोफोड यांनी भेट घेत करारावर स्वाक्षरी केली, या युद्धाचं प्रतीक म्हणून आपआपल्या देशांच्या व्हिस्कीच्या बाटल्यांची देवाणघेवाण केली आणि अधिकृतपणे 'व्हिस्की वॉर'ला पूर्णविराम दिला.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.