वर्षभर विना तिकीट रेल्वेने प्रवास केला; TC ने पकडलं तरी काहीच कारवाई केली नाही; कारण जाणून शॉक व्हाल

एका तरुणाने वर्षभर रेल्वे विना तिकीट फुकट प्रवास केला. या तरुणाना अनेकदा TC ने पकडले. मात्र, त्याने असं काही सांगितले की TC त्याच्यावर काहीच कारवाई करु शकला नाही. 

वनिता कांबळे | Updated: Mar 24, 2025, 06:51 PM IST
वर्षभर विना तिकीट रेल्वेने प्रवास केला; TC ने पकडलं तरी काहीच कारवाई केली नाही; कारण जाणून शॉक व्हाल

Without Ticket Railway Travel : रेल्वे हा सार्वजनिक वाहतुकीचा सर्वात जलद आणि स्वस्त पर्याय आहे. मात्र, रेल्वे प्रवास करताना तिकीट काढणे प्रवाशांना कायद्याने बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एका तरुणाने वर्षभर रेल्वेने फुकट प्रवास केला. या तरुणाला टीसीने पकडले. मात्र, तरीदेखील या तरुणावर टीसीने काहीच कारवाई केली नाही यामागचे कारण जाणून शाॉक व्हाल.

एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते. मात्र, एका तरुणाने वर्षभर विना तिकीट फुकट प्रवास केला तरी टीसीने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. या तरुणाने एक अशी आयडिया वापरली कीज्यामुळे टीसी देखील याच्यावर काहीच कारवाई करु शकला नाही. या तरुणाने रेल्वेचा नियम वापरुनच फुकट प्रवास केला. या तरुणाने जेव्हा टीसीला या नियमाबद्दल सांगितले तेव्हा टीसी देखील शॉक झाला. 

ब्रिटन देशातील हा रेल्वे प्रवासी आहे. प्रत्येक देशात रेल्वेची वेगळी व्यवस्था आहे. याप्रमाणे रेल्वेचे नियम देखील वेगळे आहेत. भारतासारख्या अनेक देशांमध्ये रेल्वेला विलंब होणे ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र, ब्रिटनमध्ये  रेल्वेला विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई दिली जाते. ब्रिटनमध्ये राहणारा एड वाईज नावाच्या तरुणाने रेल्वेच्या याच नियमाचा वापर करुन रेल्वेने वर्षभर मोफत प्रवास केला आहे. 

रेल्वेने फुकट प्रवास करुन एड वाईज याने वर्षभराचे मिळून तिकीटाच्या पैशांचे 1.6 लाख रुपये वाचवले आहेत. एड वाईज या लेखक आहे. एड वाईज याने ट्रेनचे वेळापत्रक आणि विलंब पद्धतींचे बारकाईने निरीक्षण केले. ब्रिटिश रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे उशिरा आल्यास पैसे परत मिळतात. त्याने याचा फायदा घेण्याची योजना आखली. 

संप, देखभालीचे काम आणि खराब हवामान यामुळे रेल्वेला विलंब होतो. त्याने याच वेळा पाहून रेल्वेचे बुकिंग केले. या सर्व ट्रेन विलंबाने आल्या याची भरपाई एड वाईज याला मिळाली. ब्रिटनमध्ये, ट्रेन उशिरा आल्यास प्रवाशांना भरपाई योजनेअंतर्गत परतावा दिला जातो. रेल्वेला 15 मिनिटांच्या विलंबावर 25 टक्के, 30 मिनिटांच्या विलंबावर 50 टक्के तर 1 तासापेक्षा जास्त विलंब झाल्यावर तुकीटाचे सर्व पैसे रिटर्न मिळतात. वाईजने या धोरणाचा पुरेपूर फायदा घेतला आणि प्रत्येक वेळी तिकिटे बुक केली ज्यामुळे त्याला 100 टक्के परतावा मिळाला.2023 मध्ये एड वाईज याने एकही रुपया खर्च न करता रेल्वेने फुकट प्रवास केला.