देशाची पहिली टॉपलेस पंतप्रधान; तरुणीच्या वक्तव्यानं खळबळ

पंतप्रधानांना दिलं आवाहन...   

Updated: Oct 17, 2021, 01:11 PM IST
देशाची पहिली टॉपलेस पंतप्रधान; तरुणीच्या वक्तव्यानं खळबळ
छाया सौजन्य- सौशल मीडिया

मुंबई : युनायटेड किंग्डम (United Kingdom) मधील एका मुलीच्या वक्तव्यानं जबरदस्त खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरु असून, अनेकांच्याच भुवया यामुळं उंचावू लागल्या आहेत. 31 वर्षीय क्लायमेट अॅक्टिविस्ट लॉरा एमहर्स्ट असं तिचं नाव. युकेची पहिली टॉपलेस पंतप्रधान होणार असल्यामुळं तिचीच चर्चा सुरु आहे. लॉरा मागील अनेक महिन्यांपासून टॉपलेस टॉपलेस होऊन क्लायमेट चेंज अर्थात हवामानातील बदलांसाठी नागरिकांना जागरुक करण्याचं काम करत आहे. 

डेली स्टारच्या वृत्तानुसार, लॉरा अॅमहर्स्ट सध्या पॉलिटीकल सायन्स या विषयाचा अभ्यास करत आहे. तिनं अजब दावा करत युकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याहून आपण चांगलं सरकार चालवू शकतो, असं सांगितलं आहे. राजकारणाबाबत आपल्याला जॉन्सन यांच्यापेक्षा जास्त माहिती असल्याचं ती म्हणाली होती. 

पंतप्रधान झाल्यानंतरही असेन टॉपलेस 
यंदाचं वर्ष माझ्या पदवी शिक्षणाचं अखेरचं वर्ष आहे. त्यामुळं पुढे मी राजकारणावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला पंतप्रधान व्हायला आवडेल, पण असं झालं तरीही मी टॉपलेसच राहीन असंच तिचं म्हणणं आहे. टॉपलेस होऊन निदर्शनं करणं पाहून लॉराच्या आईला धक्काच बसला होता. पण, तरीही आईनं तिला पाठिंबा दिला आहे. लॉराच्या मते ती राजकारणामध्ये किर्ती घडवण्यास सज्ज झाली आहे.