World's Largest Iceberg: जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता विनाश घडवण्याची शक्यता आहे. तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांशी टक्कर देण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या क्षेत्राच्या अद्वितीय आणि समृद्ध जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीच्या ज्या ठिकाणावर हिमखंड A23a आदळणार आहे, त्या ठिकाणी पेंग्विन, सील आणि दुर्मिळ सागरी प्रजातींचा आधीवास आहे. जर ही टक्कर झाली तर लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
A23a हिमखंडाचा आकार ग्रेटर लंडनच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. 1986 मध्ये तो फिल्चनर-रोन आइस शेल्फपासून वेगळा झाला. सुरुवातीच्या दशकांमध्ये तो समुद्राच्या तळाशी अडकला आणि हळूहळू वितळत गेला. 2020 मध्ये तो दक्षिण महासागराकडे वाटचाल करू लागला आणि 2023 मध्ये तो पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने पुन्हा आपला प्रवास सुरू केला.
'टेलर कॉलम्स' नावाच्या समुद्री भोवऱ्यांमध्ये हा हिमखंड अडकलेला आढळला. हे भोवरे समुद्राखालील टेकड्यांमुळे होतात आणि हिमखंडांना थांबवू शकतात. याच्या वजनाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. A23a चे वजन एक ट्रिलियन टनांपेक्षा जास्त होते. इतके वजन असूनही तो या भोवऱ्यांपासून वाचण्यात यशस्वी झाला.
दक्षिण जॉर्जिया क्षेत्र हे जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आहे. या बेटावर पेंग्विन आणि सील मोठ्या संख्येने राहतात. जर A23a येथे आदळला तर येथील प्राण्यांना अन्नासाठी सागरी भागात जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
'आइसबर्ग हा मूळत: खूप धोकादायक आहेत. जर तो आदळण्यापासून चुकला तर आम्हाला खूप आनंद होईल, असे दक्षिण जॉर्जिया सरकारी जहाज फॅरोसचे कॅप्टन सायमन वॉलेस यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितले.
या भागातील वन्यजीवांना एखाद्या हिमखंडामुळे धोका निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2004 मध्ये दक्षिण जॉर्जियाजवळ A38-B नावाच्या एका हिमखंडाचा भाग समुद्रात अनेक महिने अडकून राहिला होता. ज्यामुळे पेंग्विन आणि सील त्यांच्या खाद्याच्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.