कैद्याचं 5 स्टार जेल; फुटबॉल मैदान, धबधबा आणि बरचं काही...

पाब्लोने हे कारागृह इतके आलिशान बनवले की याला कधी कधी हॉटेल एस्कोबार किंवा क्लब मॅडेलीन या नावाने चर्चा होत असे. 

Updated: Aug 4, 2021, 11:39 AM IST
कैद्याचं 5 स्टार जेल; फुटबॉल मैदान, धबधबा आणि बरचं काही...

मुंबई: तुम्ही 60 आणि 70 च्या दशकात असे अनेक बॉलिवूड सिनेमे पाहिले असतील ज्यातील खलनायक एका तटबंदी असलेल्या घरात राहत होते. त्याच्या  आजूबाजूला अशी सुरक्षा होती की बघणाऱ्यांना धक्काच बसेल. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या खऱ्या आयुष्यातील एका खलनायकाबद्दल सांगणार आहोत, जो  किल्ल्यासारख्या एखाद्या घरात नाही, तर फाईव्ह स्टार जेलमध्ये राहत होता. तो एक ड्रग माफिया होता , ज्याची 'किंग ऑफ को‍कीन' म्हणून ओळखत होती आणि त्याचे  नाव पाब्लो एस्कोबार होते.

जेलमध्ये फुटबॉल मैदान आणि धबधबा 

ज्या कारागृहात पाब्लोला बंद करण्यात आले होते ते कोलंबियामध्ये होते आणि तो स्वतःच्या अटीवर या तुरुंगात राहायला गेला होता. पाब्लोने हे कारागृह इतके आलिशान बनवले की याला कधी कधी हॉटेल एस्कोबार किंवा क्लब मॅडेलीन या नावाने चर्चा होत असे. पण त्याचे मूळ नाव 'ला कॅटेड्रल' किंवा 'द कॅथेड्रल' असं होतं  आणि या नावामागे अनेक कारण आहेत.

या तुरुंगात फुटबॉल मैदान, एक जकूझी आणि अगदी धबधबा देखील होता. बरेच लोक ला कॅटेड्रलला कारागृहापेक्षा किल्ला म्हणून बघत होते.  एक किल्ला जिथून  एस्कोबारने त्याच्या शत्रूंना दूर ठेवले होते आणि त्याने स्वतःला येथे बंद करुन घेतलं. असं म्हटले जाते की एस्कोबार या तुरुंगात बसून सर्व कामकाज पाहत होता.

 कैद्यांमध्ये एस्कोबार लोकप्रिय

कोलंबियन सरकारला  एस्कोबारवर या तुरुंगात खटला चालवण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. एस्कोबार येथील कैद्यांमध्ये  खूप लोकप्रिय होता.आजही एस्कोबारच्या आठवणी या कारागृहात जपल्या गेल्या आहेत. बरेच लोक एस्कोबारला माफिया म्हणून स्विकारण्यास नकार देतात.

या शहरासाठी त्याने बरेच काही केले असा त्याचा विश्वास आहे. पण काही राजकारणी आणि पोलिसांनी एस्कोबारला घाबरून त्याच्यापुढे नतमस्तक होण्यास स्पष्टपणे  नकार दिला. अनेक  फेऱ्या मारुन चर्चा केल्यानंतर एस्कोबार शरण येण्यास तयार झाला.

एस्कोबारची सरकारसमोर अटी

एस्कोबारने चर्चेदरम्यान  शिक्षेची मुदत 5 वर्षे करण्यात यावी अशी अटी घातली होती. तो म्हणाला होता की तो स्वत: तुरुंग बांधेल ज्यामध्ये तो आपली शिक्षा भोगेल.  येथे तो त्याच्या निवडलेल्या रक्षकांना तैनात करेल आणि कोलंबियन सैनिक त्याचं शत्रूंपासून संरक्षण करतील. एस्कोबारचे विरोधक या अटींच्या विरोधात होते, पण  कोलंबियाच्या सरकारने घटनेत बदल केला. या दुरुस्तीनंतर जून 1991 पासून नागरिकांच्या प्रत्यार्पणावर बंदी घालण्यात आली.

अखेर शरणागती पत्करली

एस्कोबारने आपली स्थिती बनवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आणि तेव्हाच त्याने आपले मत बदलले जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती सीझर गविरिया यांनी कायद्यानुसारच  गोष्टी चालतील असं सांगितलं. शेवटी, अमेरिकेत प्रत्यार्पण होऊ नये म्हणून एस्कोबारने आत्मसमर्पण केले.