Worlds Most Expensive fish : जगभरात असणाऱ्या असंख्य लहानमोठ्या देशांमध्ये तितक्याच विविध अशा तेथील खाद्यसंस्कृती आहेत. शाकाहारी पदार्थांपासून मांसाहार आणि मस्त्याहारापर्यंतच्या कैक पद्धती या खाद्यसंस्कृतीतून पाहायला मिळतात. अशाच खाद्यसंस्कृतींमध्ये जगातील अनेक देशांमध्ये मस्त्याहाराला प्रचंड प्राधान्य दिलं जात असल्याचं लक्षात येतं. यामध्येही एका विशिष्ट माशाला आशियायी आणि पाश्चिमात्य देशांकडूनही पसंती मिळते.
जगभरात विविध पदार्थांसाठी वापरला जाणारा हा मासा त्याच्या किमतीमुळं भुवयाच उंचावून जातो. कारण, तो हजारो आणि लाखोंना नव्हे तर, कोट्यवधींमध्ये विकला जातो किंबहुना विकला गेला आहे. जपानच्या 'टोयोसु फिश मार्केट' इथं दर दिवशी माशांचा मोठा लिलाव पार पडतो. असाच लिलाव नुकताच पार पडला असून, तिथं वर्षातील पहिल्या लिलावादरम्यान 'ब्लूफिन टूना' या माशासाठी तब्बल 510 मिलियन येन म्हणजेच 29 कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम मोजण्यात आली.
हा मासा 'पॅसिफिक ब्लूफिन टूना' म्हणूनही ओळखला जातो, समुद्राची राणी, अशी या माशाची आणखी एक ओळख. प्रथमदर्शनी सुरमईसारखा दिसणारा हा मासा चवीला सुरमईहूनही उत्तम असून जगातील चवीष्ट माशांमध्ये तो गणला जातो. मराठीत हा मासा कुपा म्हणून ओळखला जातो. ही माशाची अतिशय दुर्लभ प्रजाती असून, खोल समुद्रात अतिशय वेगानं पोहण्यासाठी हा मासा ओळखला जातो. फक्त चवीलाच नव्हे, तर हा मासा आरोग्यासाठीसुद्धा तितकाच फायदेशीर मानला जातो.
अतिशय चवदार आणि आरोग्यास फायद्याच्या अशा या ब्लू फीन टूनासाठी तब्बल 29 कोटींची रक्कम मोजण्यात आली असून या माशाचं वजन आहे 243 किलो. म्हणजेच 12 लाख रुपये प्रति किलो असा सरळ हिशोब. कियोशी किमुरा यांनी हा मासा खरेदी केला असून, सुशी या जगप्रसिद्ध पदार्थासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'SUSHI ZANMAI' या रेस्तराँ चेनचे ते मालक आहेत.
A Japanese sushi restaurant bid $3.24 million (510 million yen) for a single bluefin tuna, the highest price ever paid, at the annual New Year auction at Tokyo's Toyosu fish market https://t.co/qhK9vTK2CU pic.twitter.com/a6BnLuyRjb
— Reuters (@Reuters) January 5, 2026
आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आणि त्याला अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी त्यांनी हा मासा खरेदी केला. किमुरानं मागील वर्षी याच लिलावात 20 कोटी रुपयांचा मासा खरेदी केला होता. यंदा हाच विक्रम मोडित काढत त्यांनी साऱ्या जगाचं लक्ष वेधलं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.