'या' ठिकाणी दोन लग्न करणं बंधनकारक.. नाही केलं तर थेट जन्मठेप

Two Marriage : प्रत्येक देशात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. मात्र अशा देशाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? जिथे पुरूषांना दोन लग्न बंधनकारक आहे. नाही केलं तर थेट कारागृहात धाडलं जातं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 12, 2023, 10:02 AM IST
 'या' ठिकाणी दोन लग्न करणं बंधनकारक.. नाही केलं तर थेट जन्मठेप

Marriage with Two Wife :  विवाह आणि धार्मिक बाबींबाबत प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येकाची स्वतःची परंपरा आणि प्रथा आहेत. एक काळ असा होता की बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित होती, पण हळूहळू ही प्रथा सर्वत्र बंद झाली. पण असा एक अनोखा देश आहे, जिथे एक नाही तर दोन लग्ने होतात, तीही महिलांची नव्हे तर फक्त पुरुषांची! महत्त्वाचं म्हणजे या प्रथेला कुणीही विरोध करत नाही तर अतिशय आनंदाने ही प्रथा पार पाडली जाते. जर त्या माणसाने यावर आक्षेप घेतला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

एवढेच नाही तर बायकाही आपल्या पतींना दुसरी बायको करण्यापासून रोखू शकत नाहीत. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा कोणता देश आहे?

महिलांमुळेच होतात दोन लग्न 

आफ्रिका खंडाच्या देशात इरिट्रियामध्ये पुरूषांना दोन लग्न करणे बंधनकारक आहे. पुरूषांनी याला नकार दिल्यास जन्मठेप होऊ शकते. तसेच महिला देखील या प्रथेला मान्यता देतात. अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. या विचित्र प्रथेमागे देशात महिलांची असलेली सर्वाधिक लोकसंख्याच कारणीभूत असल्याच सांगण्यात येतं. 

दोन लग्न ही सक्ती

तुम्हाला आवडो वा न आवडो, तुम्ही सुखी असो वा दुःखी, तुमच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असेल, पण इथे तुमची दोनच लग्ने होतील. तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला दोन बायका सांभाळाव्या लागतील, हे प्रत्यक्षात या देशात घडते. आणि इथला कायदाही तेच सांगतो.

होऊ शकते जन्मठेप

आफ्रिकन खंडातील एका देशात, प्रत्येक पुरुषाला दोनदा लग्न करणे आवश्यक आहे, विचित्र गोष्ट अशी आहे की येथे तुम्ही तसे करण्यास नकार देऊ शकत नाही, अन्यथा तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आणि बायकांनीही आक्षेप घेतल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

महिलाच याला कारणीभूत 

या विचित्र प्रथेमागे इरिट्रिया या देशातील महिलांची लोकसंख्या जबाबदार आहे. महिलांची संख्या ही पुरूषांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ही बाब लक्षता येऊन समतोल राखण्यासाठी ही प्रथा सुरू केली आहे. एक पुरुष दोन महिलांशी लग्न करेल. असं केलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा नियम आहे. या प्रथेमुळे इरिट्रिया या देशाला अनेक टिकांना सामोरे देखील जावे लागले.