Baba Vanga World War 3 Predictions: इराण- अमेरिका संघर्षामुळंच जगभरात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा झाली असं नाही. तर यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष, अफगाणिस्तानातील अस्थिरता, गाझापट्टीवरून सुरू असणारा संघर्ष आणि भारत- पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला संघर्ष या साऱ्या घटना मागील 4 ते 5 वर्षांमध्ये घडल्या. जेव्हाजेव्हा युद्धजन्य परिस्थिती उदभवली, तेव्हातेव्हा सातत्यानं बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख झाला.
इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केल्यानंतरसुद्धा अगदी युद्धविराम होईपर्यंत सोशल मीडियावर बाबा वेंगा आणि त्यांनी कथित स्वरुपात तिसऱ्या महायुद्धाबाबत केलेल्या भविष्यवाणीची बरीच चर्चा झाली. सारं जग सध्या विनाशाच्या मार्गावर असून, हा विद्ध्वंस आता जवळ आहे असंही म्हटलं गेलं. या भाकितानं काहींचा थरकाप उडाला, तर काही मंडळी हे बाबा वेंगा कोण, हाच प्रश्न उपस्थित करताना दिसले. कारण, जिथंजिथं जगाच्या भविष्याचा विषय येतो तिथंतिथं बाबा वेंगा यांची भविष्यवाणीसुद्धा ओघाओघानं चर्चेत येते.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यांमध्ये बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीचा संदर्भ काही नेटकऱ्यांनी दिला. 2026 मध्ये वैश्विक संघर्ष परमोच्च शिखरावर पोहोचेल असं बाबा वेंगांनी वर्तवलं होतं असं काहीजण म्हणाले, तर एका निश्चित काळात तिसऱ्या विश्वयुद्धाचा शेवट होईल असं ते म्हटल्याचंही काहीजण म्हणाले. मात्र, याचे कोणतेही अधिकृत पुरावे किंवा ही लिखीत भविष्यवाणी अस्तित्वात नाही, जिथं असे संदर्भ आढळतात असं सांगण्यात येतं.
बाबा वेंगा यांच्या नावे करण्यात येणारे बहुतांश दावे अस्पष्ट आणि प्रचितात्मक व्याख्यांवर आधारित असून, त्यांच्याकडे अनेकदा मूळ संदर्भाशिवायच पाहिलं जातं. दरम्यान बाबा वेंगा यांनी तिसऱ्या विश्वयुद्धाची किंवा ते युद्ध संपण्याची भविष्यवाणी केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र काही व्याख्यांमधून त्यांनी वैश्विक अशांततेसह संघर्षाबाबतची चर्चा केली होती असं सांगितलं जातं. मात्र हे संदर्भ व्यापक असून, त्यांच्यात कालमर्यादेचा उल्लेख नाही.
जाणकारांच्या मते अनेक व्हायरल दावे, परस्पर संबंध नसणाऱ्या गोष्टींना एकवटून करण्यात येतात आणि अनेकदा त्यांना भविष्यवाणी म्हणून सादर केलं जातं. परिणामी अनेकदा चुकीची माहिती पुढे जाते आणि चर्चेचा विषय ठरते. बऱ्याचदा माहितीती पडताळणी न केल्यामुळंही ठोकताळ्यांवर विश्वास ठेवला जातो. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी व्हायरल होण्यामागची कारणं खालीलप्रमाणं...
- रहस्यमयी भविष्यवाणीबाबत सामान्यांचं कुतूहल
- पडताळणी न करता पसरवली जाणारी माहिती
- वाढती वैश्विक अस्थिरता आणि संघर्ष
बऱ्याचदा भविष्यवाणीवर कोणत्याही पुनर्पडताळणीशिवाव विश्वास ठेवू नये असाच सल्ला तज्ज्ञ देतात. अस्पष्ट भाषा आणि तर्कांची जोडणी असंख्य गोष्टींशी करता येऊ शकते. किंबहुना त्याचा जगभरातील असंख्य घटनांळी मेळही साधतो. याचा अर्थ ते तर्क खरे आहेतच असं नाही. बऱ्याचदा सोशल मीडियावर काही माहिती अतिरंजित करून सांगण्यात किंवा दाखवण्यात येते ज्यामुळं बाबा वेंगा आणि त्यांच्या भविष्यवाणीबाबतही अशा चर्चा रंगतात.
सध्या जगभरात जे चित्र आहे ते विदारक आहेच. मात्र, अस्पष्ट भविष्यवाणीवर अनेक मंडळी अवलंबून असल्यानं विनाकारण जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ज्यामुळं या तणावाच्या स्थितीत अधिकृत माहिती, यंत्रणांच्या सूचनांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं जातं. अनेक दावे करण्यात येत असले तरीही तिसऱ्या विश्वयुद्धाचा संदर्ब देत बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केल्याचा कोणताही सबळ पुरावा नसल्यानं त्याबाबतची चर्चा ही सत्यघटना नव्हे, तर तर्कवितर्कांवर आधारित आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.