जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण

Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 14, 2023, 04:24 PM IST
जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण title=
aamir khan spotted with his first wife reena dutta at jewellary shop

Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आमिर खान आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता यांची. 2002 साली त्यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यानंतरही ते अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांची चर्चा रंगलेली आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार त्या रीना दत्ता आणि आमिर खान यांच्या लेकीचे म्हणजेच आयरा खान हिचे लग्न ठरले आहे.

लवकरच आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. त्या दोघांचाही साखरपुडा झाला आहे. त्या दोघांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळीही त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु त्यातूनही रीना दत्ता आणि आमिर खान यांची चर्चा रंगलेली आहे. 

1986 साली आमिर खान आणि रीना दत्ता यांचे लग्न झाले. त्यानंतर 15 वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं देखील आहेत. त्यानंतर आमिर खाननं 2005 साली किरण रावशी लग्न केले. 2021 मध्ये आमिरनं किरण रावशीही घटस्फोट घेतला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. त्यानंतर आमिर खान प्रचंड ट्रोलही झाला होता. आमिर खान हा दंगलमध्ये काम केलेली अभिनेत्री फातिमा सना शेखच्या प्रेमात आहे आणि दोघंही लग्न करणार आहेत अशीही जोरात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर आमिर खानही प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यातून त्यानंतर दोन वर्षांनी त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपटही प्रचंड प्रमाणात ट्रोल झाला होता. 

हेही वाचा : 'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

यावेळी त्या दोघांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी ते एका ज्वेलरी शॉपच्या जवळ स्पॉट झाले. त्यांनी एकत्रितपणे हसत हसत पापाराझींना पोझ दिली होती. त्यामुळे त्यांच्या या हॅप्पी फोटोमुळे सोशल मीडिवावर जोरदार चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांनाही ट्रोल करण्यात आले आहे. अनेकांनी त्यांना असं पाहून मग घटस्फोट का घेतला असंही विचारलं आहे. त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा रंगलेली आहे.