VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 4, 2018, 07:49 AM IST
VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल  title=

मुंबई : हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

गाण्याचे बोल असे आहेत,'तेरे ठुमके सपना चौधरी मेरा मन तरसावे सै' या गाण्यावर अभय देओल आणि सपना चौधरी एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं सध्या भरपूर पसंद केलं जात आहे. 26 मार्च रोजी 'नानू की जानू' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभय देओल यामध्ये भरपूर मस्ती करताना दिस आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हाला देखील भरपूर हसू कोसळेल. 

‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेल्या सपनाच्याच नावाची सध्या चर्चा होताना दिसत आहे. याआधी सपनाचे ‘लव बाईट’ हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. भांगोवर या सिनेमातील हे गाणे हिटही झाले आहे. येत्या १५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.  हरियाणातील प्रसिद्ध डान्सर अशी सपना चौधरीची ओळख आहे. बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर, मी फार आनंदी आहे. मी माझ्यासोबत अशा आठवणी घेऊन जात आहे, ज्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. या घरात राहिलेल्या साऱ्यांनाच मला पुन्हा भेटायला आवडेल.