वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना

Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं. 

नेहा चौधरी | Updated: May 19, 2024, 10:54 AM IST
वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना title=
age of 12 13 wrong photos were clicked and posted on adult sites Janhvi Kapoor recounts painful incident

Janhvi Kapoor Sexualised : जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. क्रिकेट प्रेमावर आधारित जान्हवी आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटानिमित्ताने जान्हवी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. याच चित्रपटाचा निर्माता करण जोहरशी खास बातचीत केलीय आहे. या मुलाखतीत तिने त्याच्या आयुष्यातील वेदनादायी आणि धक्कदायक घटनाचा खुलासा केला. 

जान्हवी कपूरने सांगितली 'ती' घटना

करण जोहरने या मुलाखती जान्हवीला ऑब्जेक्टिफिकेशनबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ''त्या क्षणाबद्दल सांगताना जान्हवी भावूक झाली. ती म्हणाली की पापाराझींनी तिला खूप अस्वस्थ केलंय. ती 12-13 वर्षांची असेल तेव्हा एका कार्यक्रमात ती श्रीदेवी आणि बोनी कपूरसोबत गेली होती. तेव्हा पापाराझींनी चुकीच्या पद्धतीने माझे फोटो काढले. एवढंच नाही ते प्रौढ साइट्सवर देखील अपलोड झाले. हे फोटो पाहून शाळेतील मुलं तिची खिल्ली उडवायचे.''

पुढे अभिनेत्री म्हणाली की, ''तिला अशा गोष्टींचा सामना करुन आज खूप दिवस झाले आहेत. पण जेव्हा एखादी मुलगी तिच्या पद्धतीने तयार होते तेव्हा तिच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात.'' जान्हवी भावूक होत म्हणाली की, ''नॅव्हिगेट करणे ही खूप विचित्र गोष्ट आहे आणि मी खूप वेळापासून नॅव्हिगेट करत आहे. मला यातून बाहेर याला हवं. मला विश्वास आहे इतर लोक या गोष्टींनी इतर मार्गीने त्यातून रस्ता काढतात. हा प्रश्न माझ्यासाठी गंभीर होता. एका चरित्रहानी सारखा होता.''

हेसुद्धा वाचा - पोटाची खळगी भरण्यासाठी चित्रपटात मार खायचा हा सुपरस्टार, एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा आज कोट्याधीश

जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्माने केलंय. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव दुसऱ्यांदा एकत्र पडद्यावर झळकणार आहे. याआधी त्यांनी 'रुही'मध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती.