पतीचा 'आजोबा' म्हणून उल्लेख केल्याने 'ही' मराठी अभिनेत्री भडकली, नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar Avinash Narkar :  सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचीच. त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 8, 2023, 03:41 PM IST
पतीचा 'आजोबा' म्हणून उल्लेख केल्याने 'ही' मराठी अभिनेत्री भडकली, नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर title=
aishwarya narkar hits back on comment after trolling avinash narkar

Aishwarya Narkar Avinash Narkar : सोशल मीडियावर कोणत्याही सेलिब्रेटीनं कितीही चांगले फोटो टाकले तरीसुद्धा त्यांना ट्रोल हे केलंच जातं. हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तो सर्वांसाठीच खुला आहे. त्यामुळे कोण कधी कशी कमेंट करेल याची काहीच शाश्वती नाही. सोशल मीडियावर अजून एक कपल चर्चेत असतं आणि ते म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. त्यांची जोडी ही इन्टाग्रावर चांगलीच चर्चेत असते. त्यांचे रिल्सही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या एका पोस्टवर एका नेटकऱ्यांनं केलेली कमेंट वाचून ऐश्वर्या नारकरांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे.

अविनाश नारकर हे आता ज्येष्ठ असेल तरीसुद्धा त्यांचा उत्साह हा एखाद्या तरूणाला लाजवेल असा आहे. परंतु एका नेटकऱ्यानं यावेळी अविनाश नारकरांना आजोबा असं म्हटलं आहे. त्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या नारकर यांनी जबरदस्त कमेंट केली आहे. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे आपले कपल गोल्स कायमच आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरीही कमेंट करायला विसरत नाहीत. यावेळी त्यांनी ट्रेडिशनल वेअरमध्ये एक रील शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, ''कपल गोल्स… बदल तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे… फक्त चांगले आणि त्याच्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करा… एकमेकांशी संवाद साधा… सगळं काही शेअर करा… मोकळे व्हा… जे तुमच्यासाठी चांगेल आहे ते आत्मसात करा... कोणतीही परिस्थिती असू दे एकमेकांना पाठिंबा द्या… तुम्ही पती आणि पत्नी आहात हे महत्त्वाचे नाही. तुम्हाला आयुष्य नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल…प्रयत्न करून पाहा…''

हेही वाचा बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकप्रकारे असा मेसेज हा त्या दोघांनी शेअर केला आहे. परंतु या व्हिडीओखाली 'त्या' कमेंटवरून अविनाश नारकरांना ट्रोल केलं आहे. यावेळी या नेटकऱ्यानं लिहिलं की, ''नमस्कार आजोबा'' यावरून ऐश्वर्या नारकर यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, ''काय म्हणाताय पणजोबा''. सध्या त्यांच्या या कमेंटवनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐश्वर्या नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या लग्नाला 25 वर्षे पुर्ण झाली आहेत. ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याची आजही चर्चा होताना दिसते. सध्या त्यांचा हा व्हिडीओही खूप चर्चेत आहे.