Aishwarya on her past relationship : ‘बिग बॉस’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. हा एक असा शो आहे ज्यामुळे अनेक लोक एका रात्रीत स्टार झाले. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक त्याचं खासगी आयुष्य आणि कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेले ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे आता बिग बॉसमध्ये दिसत आहेत. हे जोडपं त्यांच्या लव्ह लाईफमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल पांड्याचा सतत कुठे ना कुठे चर्चा सुरु होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं की ईशा मालवियानंतर आता ऐश्वर्या शर्माचा एक्स-बॉयफ्रेंड राहुल पांड्या बिग बॉसमध्ये पदार्पण करणार आहे. अशात प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि राहुलच्या नात्याविषयी अनेक गोष्टी कळतील. दरम्यान, एका मुलाखतीत राहुलनं ऐश्वर्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
राहुलनं त्याच्या मुलाखतीत दावा केला की ऐश्वर्यानं त्याला धोका दिला आहे आणि नील भट्टसोबत तिची वाढत्या जवळीकतेनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. राहुलसोबत ब्रेकअप केल्याच्या काही काळातच तिनं लग्न केलं. ऐश्वर्याच्या एक्सचं वक्तव्य समोर आल्यानंतर या प्रकरणातील संपूर्ण सत्य काय आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांची इच्छा आहे. आता ऐश्वर्या शर्मानं तिच्या एक्ससोबतच्या नात्याविषयीचं सत्य सांगितलं आहे.
हेही वाचा : 'हा तुझा फॅमिली शो?' 20 वर्षांच्या अभिनेत्रीचा इंटिमेट व्हिडीओ पाहताच सलमानवर भडकले नेटकरी
ऐश्वर्या तिच्या एक्स विषयी बोलत असताना तिचा पती नील भट्टनं तिला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर त्यानं तिची स्तुती देखील केली आहे. ऐश्वर्या म्हणाली की नीलला भेटण्याआधी ती तिच्या आयुष्यात एका वाईट काळातून जात होती आणि नीलनं तिला त्यातून बाहेर काढलं आहे. याविषयी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की ती एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती आमि त्या नात्यात ती तिचा आत्मसन्मान हरवत होती. नीलनं तिला तो आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मदत केली आणि या कठीण काळात तिची साथ देत तिला सांभाळलं.ऐश्वर्यानं तिच्या जुन्या रिलेशनशिपविषयी सांगितलं मात्र, तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव घेतंल नाही. ‘गुम हैं किसी के प्यार में’ या मालिकेमुळे देखील ऐश्वर्या चर्चेत होती.