Allu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अ‍ॅक्शन...

Allu Arjun Birthday Pushpa 2 Teaser : अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समोर आला 'पुष्पा 2' चा पावरपॅक टीझर...

दिक्षा पाटील | Updated: Apr 8, 2024, 12:07 PM IST
Allu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अ‍ॅक्शन... title=
(Photo Credit : Social Media)

Allu Arjun Birthday Pushpa 2 Teaser :  ज्या गोष्टीची सगळे प्रतिक्षा करत होते अखेर ते घडलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पुष्पा राजची जादू, स्टाइल आणि त्याच्या अंदाजानं सगळ्यांचे लक्ष वेधल आहे. त्याचा हा लूक पाहूण प्रेक्षकांना आश्चर्य झाला आहे. तर सोशल मीडियावर याच टीझरची चर्चा सुरु झाली आहे. 

अल्लू अर्जुननं त्याच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या 1 मिनटं 8 सेकंदाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनच्या पायात घुंगरू, कानात झुमका, डोळ्यात काजळ आणि साडी असा काही लूक आहे. तर त्याच्या हातात त्रिशूल असून त्याच्या शत्रूंशी तो लढताना दिसत आहे. तो एकटाच त्याच्या शत्रूंवर भारी पडतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनच्या या लूकनं सगळेच हैराण झाले आहे. हा धमाकेदार टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर नक्कीच शहारे आले आहेत. 

टीझर प्रदर्शित होण्याआधी अल्लू अर्जुननं त्याच्या या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. त्यासोबत त्यानं कॅप्शन दिलं होतं की 8 एप्रिलला 11 वाजून 7 मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या हटके स्टाइलमध्ये दिसत आहे. त्यात त्याच्या हातात कुऱ्हाड असून तो सिंहासनवर बसल्याचे दिसत होते. 

दरम्यान, 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटात लाल चंदनाची तस्करीच्यामध्ये पुष्पा राज आणि श्रीवल्लीची लव स्टोरी दाखवली आहे. या सगळ्यात खूप मोठा फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे. पहिल्या पार्टच्या शेवटच्या सीनमध्ये पुष्पा आणि श्रीवल्लीचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर त्याआधी शेखावतसोबत झालेला वाद पाहायला मिळाला आहे. तर त्याच्या या सीक्वेलमध्ये त्या दोघांमध्ये कसं काय असणार आहे हे पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद यांच्याशिवाय धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटाचा बजेट हा 500 कोटींचा असल्याचं म्हटलं जातं. तर 15 ऑग्सट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.