अमिताभ बच्चन यांची नात 'या' अभिनेत्याच्या प्रेमात; अखेर समोर आला 'तो' व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत डेटिंगच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Updated: Oct 31, 2023, 07:26 PM IST
अमिताभ बच्चन यांची नात 'या' अभिनेत्याच्या प्रेमात; अखेर समोर आला 'तो' व्हिडीओ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत डेटिंगच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या अफवांमध्ये आणखीनच भर पडली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा हे लव्हबर्ड्स डिनर डेटवर जाताना दिसलं. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

नव्या नवेली नंदा बॉयफ्रेंड सिद्धांतसोबत दिसली
अलीकडेच, नव्या आणि सिद्धांत दिग्दर्शक शकुन बत्रा आणि नव्याची आई श्वेता बच्चन यांच्यासोबत डिनरवरुन बाहेर पडताना दिसले. व्हिडिओमध्ये, श्वेता बच्चन पहिल्यांदा ईव्हेंट वेन्यूहून बाहेर पडली यावेळी ती  तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारताना दिसतेय. यानंतर नव्या नंदा, सिद्धांत चतुर्वेदी आणि शकुन बत्रा दिसतायेत. नव्या आणि सिद्धांत बाहेर पडताना गप्पा मारताना दिसतायेत.

मात्र सिद्धांत मध्येच थांबतो, तर नव्या आणि बत्रा सुरू गप्पा मारतात. यानंतर सिद्धांतही नव्या आणि बत्रासोबत त्याच गाडीतून निघून जातो. या नाईट आउट दरम्यान, नव्या नंदा स्लिट, ओपन हेअरस्टाईल आणि हँडबॅगसह नेव्ही ब्लू मिडी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर सिद्धांत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होता.

सिद्धांत आणि नव्या मुव्ही डेटवर दिसले होते
याआधी, 14 जून 2023 रोजी, नव्या आणि सिद्धांत एका मल्टिप्लेक्सच्या बाहेर दिसले होते. यावेळी अशा परिस्थितीत दोघंही मास्क लावून तोंड लपवत या सिनेमासाठी आले होते. मात्र, तरीही ते मीडियाच्या नजरेत येण्यापासून स्वत:ला वाचवू शकले नाही. नव्याने यासाठी कॅज्युअल लूक निवडला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा यांनी अद्याप त्यांचं नाते सार्वजनिक केलं नाही मात्र ते त्यांचं नातं सार्वजनिक करण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. अनेक महिन्यांच्या लपून-छपून डेटिंगनंतर आता दोघंही एकत्र दिसत आहेत. काल रात्री दोघंही एकाच गाडीतून पार्टीला निघताना दिसले.