सलमान, करण जोहर नाही तर हा अभिनेता बिग बॉस OTT च्या दुसऱ्या सीझनचं करणार होस्टिंग

रिएलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 1'चा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता.

Updated: Jul 4, 2022, 03:35 PM IST
सलमान, करण जोहर नाही तर हा अभिनेता  बिग बॉस OTT च्या दुसऱ्या सीझनचं करणार होस्टिंग title=

मुंबई : रिएलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 1'चा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. जो खूप यशस्वी ठरला. आता या शोचा दुसरा सीझन येऊ शकतो. यासोबतच या शोच्या होस्टच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. यावेळी ज्या सुपरस्टारचं नाव बिग बॉस 2 चं होस्ट म्हणून समोर आलं आहे.  रिपोर्ट्सनुसार, असं सांगितलं जात आहे की, हा सीझन बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग होस्ट करू शकतो. जरी अधिकृतपणे काहीही पुष्टी झालेली नाही आणि अद्याप कोणतीही घोषणा केली गेली नाही.

त्यामुळे हे नाव बदललं जात आहे
एका वृत्तानुसार, सूत्राने सांगितलं आहे की, ''निर्मात्यांनी बिग बॉस OTT च्या दुसऱ्या सीझनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना करण जोहरकडून तारखा न मिळाल्याने निर्मात्यांनी रणवीर सिंगला शो होस्ट करण्यासाठी फायनल केलं आहे. यापूर्वी रणवीर सिंग आणखी एक रिअॅलिटी शो 'द बिग पिक्चर' होस्ट केला आहे.

पाच स्पर्धक असतील फक्त 
सूत्रांवर विश्वास ठेवला तर या शोच्या दुसऱ्या सीझनमध्येही पाच स्पर्धक असतील. लोकप्रिय टीव्ही स्टार्स कांची सिंग, महेश शेट्टी आणि पूजा गौर यांना फायनल करण्यात आलं आहे. निर्माते संभावना सेठ आणि पूनम पांडे यांना बोर्डात आणण्यास उत्सुक आहेत. परंतु अभिनेत्रींनी अद्याप साइन अप केलेलं नाही.

पहल्या सीझनचा विनर
दिव्या अग्रवाल पहिल्या सिझनची विजेती झाली आणि निशांत भट्ट उपविजेता ठरला. या शोदरम्यान लोकप्रिय अभिनेत्री शमिता शेट्टीने खूप चर्चेत आली होती.