कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?

Rajpal Yadav Cannes Film Festival : राजपाल यादव लावणार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी... काय आहे त्या मागचं खरं कारण

दिक्षा पाटील | Updated: May 17, 2024, 10:49 AM IST
कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी? title=
(Photo Credit : Social Media)

Rajpal Yadav Cannes Film Festival : कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री दीप्ति सधवानी ही ऑरेंज गाऊनमध्ये दिसली. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि कियारा आडवाणीनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले, पण तुम्हाला सगळ्यांना एका गोष्टीनं आनंद होईल आणि ती म्हणजे या कान्सच्या रेड कार्पेटवर आता राजपाल यादव डेब्यू करणार आहे. कान्सच्या लिस्टमध्ये राजपाल यादवचं नाव समोर आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले. त्याचं कारण म्हणजे फॅशन परेड असलेल्या या कार्यक्रमात राजपाल यादव कशी हजेरी लावतोय? पण त्यामागे एक मोठं कारण आहे... चला जाणून घेऊया कारण...

राजपाल यादव हा नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. पण त्यातली सगळ्यांच्या मनात छाप सोडणारी त्याची एक कॉमेडियन म्हणून असलेली भूमिका आहे. अशात त्यानं परदेशात असलेल्या कान्स फेस्टिव्हल दरम्यान रेड कार्पेटवर वॉक करताना पाहणं सगळ्यांसाठी आश्चर्याचं असेल. 

राजपाल यादव का लावतोय कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी?

राजपाल यादव हा त्याच्या 'काम चालू है' या आगामी चित्रपटाच्या चित्रपटामुळे कान्सला आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याच्या या चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे राजपाल यादव कान्सचा भाग होणार आहे. त्यासोबत चित्रपटाचा दिग्दर्शक पलाश मुच्छल देखील तिथे दिसणार आहे. त्याचे फोटो स्वत: राजपाल यादवनं शेअर केले आहेत. 

राजपाल यादवनं बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेली उत्सुकता सांगितली आहे. राजपाल यादवनं सांगितलं की मी खूप आनंदी आहे की IMPAA नं माझ्या चित्रपटाला पसंती दर्शवली आणि कान्सला पाठवलं. दरम्यान, त्यानं हा देखील खुलासा केला की त्याला या आधी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलावण्यात आलं होते, पण त्याला कोणत्या चित्रपटासाठीच फक्त इथे हजेरी लावायची होती. त्याला  खूप आनंदी होते की चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळत आहे. हे खूप महत्त्वाचं असतं. राजपालनं पुढे सांगितलं की कोणत्याही चित्रपटासाठी या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येणं ही खूप मोठी गोष्ट असते. हा चित्रपटांसाठी व्यापार केंद्रासारखे आहे, त्यामुळे तिथं जाणं चित्रपटासाठी अभिमानास्पद आहे. एवढ्या चांगल्या आशयाचा चित्रपट अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जाऊ शकला याचा राजपालला खूप आनंद आहे.

हेही वाचा : दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट

राजपाल यादवचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचं म्हटलं जातं. राजपाल यादव, मनोज पाटील यांची या चित्रपटात भूमिका आहे. त्यात एका रस्ता अपघातात तो त्याच्या मुलीला गमावतो. हा चित्रपट 19 मे रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे.