फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा

Bollywood Celebrities :  बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 22, 2024, 12:36 PM IST
फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Bollywood Celebrities : बॉलिवूड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. अनेकदा त्यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. आता बॉलिवूड अभिनेता आणि स्विस मिलिट्री वर्ल्डवाइडचे एमडी अनुज साहनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या डार्क सीक्रेट विषयी सांगितलं. यावेळी अनुज साहनी यांनी सांगितलं की फक्त पार्टी, कॉन्सर्ट किंवा लग्नात परफॉर्म करण्यासाठी पैसे घेत लागत नाही तर अंत्य संस्कारात जाण्यासाठी देखील पैसे घेतात. 

अनुज साहनीनं ही मुलाखत बिग स्मॉल टॉक नाओ शोमध्ये याविषयी खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की बॉलिवूड सेलिब्रिटी जिथे जातात तिथे मीडिया स्वत: येते. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना वेगवगेळ्या पार्ट्यांमध्ये, मोठ्या-मोठ्या बिझनेसमॅनच्या लग्नातस कॉन्सर्ट आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात. त्यासोबत जर कोणाचं निधन झालं असेल तर त्याच्या अंत्यविधीला किंवा प्रेयर मीटवर बॉलिवूड कलाकारा पोहोचले होते. अनुज साहनीनं मोठा दावा केला. त्याच म्हणणं आहे की यासाठी देखील सेलिब्रिटी मोठी रक्कम घेतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात अनुज म्हणाले की "हे जे मोठे कलाकार असतात ना त्यांची कमाई तर लग्नकार्य किंवा एखाद्या कार्यक्रमातून होतच असते. पण, हे कलाकार अंतिम संस्काराला जाण्यासाठी आणि तेराव्याला जाण्यासाठीही पैसे घेतात. पण, अंतिम संस्कार किंवा तेराव्याला जाण्यासाठीच्या त्यांच्य किंमतीही ठरलेल्या असतात, अनेक जणांना या गोष्टीची माहिती नसेल किंवा कुणी या सगळ्याचा विचारही केला नसेल." 

कोणते कलाकार घेतात कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी पैसे

सलमान खान, शाहरुख खानसोबत अनेक मोठे कलाकार अंबानींच्या पार्टीमध्ये परफॉर्म करताना दिसतात. इथे ते फ्रीमध्ये परफॉर्म करत असले तरी इतर पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी किंवा पार्टित हजेरी लावण्यासाठी देखील ते मोठी रक्कम घेतात. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान एका कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी 3 कोटी मानधन घेतो. दीपिका पदुकोण परफॉर्म करण्यासाठी 1.5 कोटी आणि रणवीर सिंग 1.75 कोटी घेतो. रणबीर कपूर 1.5 कोटी आणि आलिया भट्ट देखील तितकेच पैसे घेते.