खास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

अवघ्या दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी अनुष्का शर्माने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. आता विराट कोहलीने तिचा वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 3, 2024, 01:52 PM IST
खास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस title=

Anushka Sharma Virat Kohli Dinner Date : बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाव कायमच पाहायला मिळते. अनुष्का आणि विराटचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सातत्याने चर्चेत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी अनुष्का शर्माने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. आता विराट कोहलीने तिचा वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

अनुष्का शर्मासाठी खास मेन्यू

विराट कोहली हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका हॉटेलचे मेन्यू कार्ड दिसत आहे. यावर 'सेलिब्रेटींग अनुष्का' असे लिहिण्यात आले आहे. विराटने या पोस्टला हटके कॅप्शनही दिले आहे. "काल रात्रीचे जेवण खूपच उत्तम होते. यासाठी शेफ मनु चंद्रा यांचे आभार. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील उत्कृष्ट जेवणांपैकी एक", असे विराट कोहलीने म्हटले आहे. 

बंगळुरुमध्ये डिनर डेट

विराट कोहली हा अनुष्का शर्माला वाढदिवसानिमित्त डिनर डेटवर घेऊन गेला होता. याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि त्यांचे काही मित्रमंडळीही दिसत आहेत. विराट आणि अनुष्का हे बंगळुरुमधील एका प्रसिद्ध लूपा या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. 

अनुष्का शर्मासाठी विराटची पोस्ट

विराटने अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली होती. यात त्याने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. “माझ्या आयुष्यात जर तू आली नसतीस तर, कदाचित मी स्वत:ला पूर्णपणे हरवून बसलो असतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह! माझं आयुष्य तू सर्वार्थाने उजळून टाकलं आहेत. आम्ही ( विराट व मुलं ) तुझ्यावर खूप प्रेम करतो.” असे विराटने म्हटले होते.  

दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माला काही महिन्यांपूर्वी मुलगा झाला. 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला होता. त्यानंतर यावर्षी 15 फेब्रुवारीला या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्या दोघांनी अकाय असे त्यांच्या लेकाचं नाव ठेवलं आहे.