Gulabi Sadi Marathi Song Viral Video:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. तो म्हणजे गुलाबी साडीचा. हे गाणं गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये आहे. संजू राठोडच्या या गाण्यानं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. लोकप्रिय डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझा ते माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनी या गाण्यावर डान्स केला आहे. हा ट्रेंड आता फक्त भारतापर्यंत मर्यादीत राहिला नाही तर त्यासोबत पाकिस्तानमध्येही पोहोचला आहे. इतकंच नाही तर या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन देखील आलं आहे. सध्या हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.
धीरज चौबे नावाच्या व्यक्तीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'गुलाबी साडी' या मराठी गाण्याचं भोजपुरी व्हर्जन शेअर केलं आहे. या व्हिडीओत धीरजनं वरच्या बाजुनला 'गुलाबी साडी' या गाण्याचा व्हिडीओ दाखवला आहे. तर खाली तो भोजपुरीमध्ये ते गाणं गाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हर्जनवर टीका केली आहे तर काहींनी या गाण्याला सर्वोत्कृष्ट म्हटलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे हे गाणं आता पाकिस्तानातही गाजतंय. या गाण्यावर ते लोक डान्स करताना दिसत आहेत. पाकिस्तानात या गाण्यावर डान्स करणारा मुलगा हा मराठा असल्याचं त्यानं त्याच्या बायोमध्ये म्हटलं आहे. या व्यक्तीचं नाव अमर प्रकाश आहे. अमर प्रकाशनं त्याच्या विवाह सोहळ्यातच या गाण्यावर डान्स केलाय. या गाण्यावर अमर आणि त्याची पत्नी डान्स करताना दिसत आहे. तर त्या दोघांचा डान्स पाहून तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी त्यांची स्तुती केली आहे.
हे गाणं युट्यूबवर चांगलंच व्हायरल होतंय. 'स्पॉटीफाय'च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये गुलाबी साडी या गाण्यानं स्वत: चे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर देखील हे गाणं झळकलं आहे. तर या व्हिडीओवर गायक संजू राठोडनं देखील कमेंट केली. त्यानं कमेंट करत खूप सुंदर असं म्हटलं आहे. तर अमर प्रकाशनं शेअर केलेल्या या व्हिडीओला 790K व्ह्युज आहेत.
हेही वाचा : घटस्फोटाच्या अफवांनंतर High Heels घालून इव्हेंटमध्ये पोहोचला रणवीर सिंह, सांगितली आवडती ज्वेलरी
दरम्यान, या गाण्याचा गायक संजू राठोडविषयी बोलायचे झाले तर त्यानं आजवर 'नऊवारी पाहिजे', 'बाप्पावाला गाणं', 'बुलेटवाली' ही गाजलेली गाणी गायली आहेत. संजू राठोड हा जळगाव येथील धानवड या तांडातला मुलगा आहे.