लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली 'अशी' अवस्था, म्हणाली 'माझं बाळ जगातलं...'

नम्रताने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लेक रुद्राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने रुद्राज आणि तिच्यामधील गमतीशीर संवाद लिहिला आहे.

Updated: Mar 16, 2024, 06:44 PM IST
लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली 'अशी' अवस्था, म्हणाली 'माझं बाळ जगातलं...' title=

Namrata Sambherao Post For Son Birthday :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांसह अनेक कलाकार हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली नम्रता संभेराव कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. नम्रता संभेरावचा मुलगा रुद्राजचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

अभिनेत्री नम्रता संभेरावने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात तिने साकारलेल्या लॉली पात्रामुळे नम्रताला एक नवीन ओळख मिळाली. नम्रता ही अभिनेत्री असण्यासोबतच एक पत्नी, आई, मैत्रीण अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळताना दिसते. नम्रताने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लेक रुद्राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने रुद्राज आणि तिच्यामधील गमतीशीर संवाद लिहिला आहे.

नम्रता संभेरावची पोस्ट 

मी: वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा रुद्राज, खूप मोठा हो
रुद्राज: आई तू पण मोठी हो
मी : रुद्राज तू आता ५ वर्षांचा झालास म्हणजे खूप मोठा झालास
रुद्राज: पण मग आई मला शिडी का लागते चढायला?
मी : हो पण तुझा ब्रेन तर शार्प होणार रुद्राज भारी नं !!
रुद्राज : पण आई पेन्सिलच्या टोकाएवढा शार्प का?

तुझ्या अशा अनेक प्रश्नांनी मी निरुत्तरित होते आणि मला अभिमान सुद्धा तितकाच वाटतो कारण माझं बाळ जगातलं सगळ्यात निरागस बाळ आहे. माझं गोंडस लेकरू आय लव्ह यू,  आई तू माझी favorite आई असतेस, हे वाक्य रोज कानावर पडतं. मला स्पेशल फिल करून देण्याबद्दल खूप थँक्स रुद्राज, असे नम्रता संभेरावने म्हटले आहे. नम्रताने तिच्या लेकाला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 

तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट केली आहे. यात कमेंट करत त्यांनी रुद्राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने चिंटू वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर सुकन्या मोने यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा रुद्राज असे म्हटले आहे. दरम्यान नम्रता संभेरावची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.