Aai kute kay karte Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. 2019 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. त्यानंतर सलग 5 वर्षे ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारतात. आता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ते जानकीसोबत खेळताना दिसत आहेत. तसेच याबरोबर त्यांनी जानकीची काळजी घेत सेटवर कशाप्रकारे शूटींग केले जाते, याबद्दल सांगितले आहे.
"आमची स्टार प्रवाह वरची मालिका “आई कुठे काय करते” ही आता दुपारी २.३० वाजता बघायला मिळणार आहे ! जेव्हापासून ही मालिका सुरू झाली तेव्हापासून लोकांचे प्रचंड प्रेम आम्हा मिळालेलं आहे, आणि अजूनही मिळत आहे. या अशा प्रचंड यशाची कारणं खूप आहेत, प्रथम म्हणजे आमची ही डायरेक्टर्स कट प्रोडक्शन कंपनी अतिशय यशस्वी प्रोड्युसर आमचे राजेंची शाही सर यांचं या सिरीयल मधलं involvement स्वतः दिग्दर्शक, अतिशय पेशनेट passionate, असल्यामुळे त्यांना यशाची गुरुकिल्ली मिळालेली आहे, त्यानंतर स्टार प्रवाह हे चॅनल त्यांची क्रिएटिव्ह टीम , भन्नाट आहेत, नमिता ही प्रोजेक्टची हेड आहे, तिने लिहिलेली गोष्ट आणि स्क्रीन प्ले जे प्रेक्षकांना मालिका बघण्यासाठी सतत त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करत असते, जी दिग्दर्शनाची टीम रवी कर्मकर, सुबोध आणि तुषार , चार वर्षे सातत्याने लिहून येतं त्याला justice देण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात, कलाकारांविषयी काही बोलायलाच नको ते एकापेक्षा एक talented आणि मेहनती आहेतच, आणि बाकीचे डिपार्टमेंट पण काय कमी नाही आहेत , मेकअप डिपार्टमेंट आर्ट डिपार्टमेंट प्रोडक्शन एडिटिंग कपडे पट शेड्युलर यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे , पालेकरांचं पण कौतुक करायला हवं कारण आज चार वर्षे त्यांनी त्यांचा बंगला आम्हाला शूटिंगला दिलेला आहे! आमचे स्पोर्ट बॉय असे खूप लोक आहेत त्यांच्या मेहनती शिवाय असं यश मिळू शकत नाही.
पण मला या यशाच्या मागे आणखीन एक कारण जाणवतं, जे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओमध्ये कदाचित जाणवेल, अतिशय कौटुंबिक वातावरणात खेळीमेळीने चेष्टा मस्करी करत प्रोफेशनल पद्धतीने शूटिंग चाललेलं असतं, या सिरीयल मध्ये 87 वर्षाचे जयंत सावरकर पण होते आणि अगदी एक वर्षाची ही जानकी पण आहे , त्यांची सुधा तेवढ्यात आत्मविशेने काळजी घेतली जायची आणि या जानकीची पण प्रत्येक जण खूप प्रेमाने काळजीपूर्वक , तिच्या कलाने तिच्या पद्धतीने ते शूटिंग केलं जातं. आपल्या घरी जेव्हा एखादा लहान बाळ येत तेव्हा आपल्या घरातलं सगळं वातावरण जसं बदलून जात, बाळ झोपलं असेल तर कसे सगळे शांतपणे आवाज न करता काम करत असतात, आणि जर ते उठलं असेल आणि खेळत असेल तर मग सगळेच घरातले त्याच्याबरोबर खेळायला उत्सुक असतात, तसंच सेटवर जानकी आली की होतं, तिच्या मूड प्रमाणे सगळ्या वातावरण होतं, मला हा फारच सुंदर अनुभव मिळतो ,खरंच ना यश म्हणजे नेमकं काय असतं ? यश म्हणजे एकमेकांचं एकमेकांवर असलेलं अफाट प्रेम एकमेकांची काळजी,माया एकमेकांविषयीचं कौतुक, जे इथे खूप अनुभवायला मिळतं !", असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 'आई कुठे काय करते' या मालिकेचा पहिला भाग 23 डिसेंबर 2019 रोजी प्रसारित झाला होता. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभूलकर हिने अरुंधती प्रमुख भूमिका साकारली आहे. तर मिलिंद गवळी हे अनिरुद्ध हे पात्र साकारताना दिसत आहे. त्यांच्या या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.