'मला पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु', पुष्कर जोगचे विधान; म्हणाला 'मी एकटा...'

पुष्कर जोग हा लवकरच 'कोक' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. 

Updated: Feb 17, 2024, 03:52 PM IST
'मला पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु', पुष्कर जोगचे विधान; म्हणाला 'मी एकटा...' title=

Pushkar Jog In Hindi Movie : एक उत्तम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला अभिनेता म्हणून पुष्कर जोगला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या मुसाफिरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेम व मैत्री या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट 2 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता पुष्कर जोग हा लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. त्याने स्वत: पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. 

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच पुष्करने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. पुष्कर जोग हा लवकरच 'कोक' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने त्याने त्याला आलेला एक अनुभव सांगितला आहे. 

"जर तुम्ही संघर्ष करत असाल तर..."

"गेल्या काही दिवसांपासून मी काही गोष्टी शिकलो आहे. जगात कोणीही खरे मित्र नसतात, ज्यांना खरोखर आपली काळजी वाटते.  जर तुम्ही संघर्ष करत असाल तर फक्त तुम्हीच स्वत:ला प्रेरणा देऊ शकता. जर तुम्ही साधे-भोळे असाल तर लोक तुमच्यावर दादागिरी करतात आणि जर तुम्ही चांगले असाल तर लोक तुमचा वापर करुन घेतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करता, याची त्यांना कदर नसते. मी एकटा आहे, पण शक्तीशाली आहे. 

एक कल्पना करा की मी देवी-देवतांच्या एका व्हॉटसअॅप ग्रुपवर आहे, जिथे स्वत: गणपती बाप्पा हे अॅडमिन आहेत आणि ते दयाळू, चांगले, प्रामाणिक आणि शुद्ध आत्म्यांना आशीर्वाद देत आहेत. त्यामुळेच मला अजिबात काळजी वाटत नाही. खरंतर मी माझ्या पुढील चित्रपटासाठी सज्ज झालो आहे. कोक असे या चित्रपटाचे नाव असून हा प्रमुख अभिनेता म्हणून माझा हिंदी चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. मला खाली पाडण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे. पण मी मात्र छान हसत आहे", अशी पोस्ट पुष्कर जोगने केली आहे. 

दरम्यान पुष्कर जोगची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पुष्करने काही महिन्यांपूर्वी निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुष्करचा बाप माणूस हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर मुसाफिरा हा त्याच्या दुसरा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा त्याचा निर्माता म्हणून दुसरा चित्रपट आहे.