'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडत होतं...', आमिर खानसोबत फोटो शेअर करत सुकन्या मोने असं का म्हणाल्या?

या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 11, 2024, 05:17 PM IST
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडत होतं...', आमिर खानसोबत फोटो शेअर करत सुकन्या मोने असं का म्हणाल्या? title=

Sukanya Mone Sarfarosh Movie 25th Anniversary : जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित सरफरोश चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटात अभिनेता आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, स्मिता जयकर, मनोज जोशी, सुकन्या मोने हे कलाकार मंडळी झळकली होती. या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सुकन्या मोने या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आमिर खानसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. त्यावेळी त्यांनी ‘सरफरोश’ चित्रपटाच्या खास आठवणींनाही उजाळा दिला. 

सुकन्या मोने यांची पोस्ट 

"कालचा दिवस खास होता.... माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडतं होते.... आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो.... पण 'सरफरोष' हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे. आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट... दिल्लीतले चित्रीकरण.... माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री... आम्ही केलेली धमाल.... त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने रेडिओ नशाने ठेवलेला खास शो.... Thank you so much.... त्यानिमित्ताने झालेलं re-union.... सगळ्या जुन्या आठवणी.... शूटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती.... इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी... आमिरचे मराठी बोलण, वागण्यातला आपलेपणा, काळजी... मनोज जोशीची भेट....जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण.... जॉनचां साधेपणा... त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा... भारवून गेले होते..... पुन्हा पुन्हा भेटत राहू", असे सुकन्या मोने यांनी म्हटले. 

सुकन्या मोने यांच्या या पोस्टवर फुलवा खामकर, स्वानंद टिकेकर, मयुरी देशमुख यांनी कमेंट केल्या आहेत. त्यांनी यावर कमेंट करताना हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तसेच आदिनाथ कोठारेनेही हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. 

दरम्यान सरफरोश हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. जॉन मॅथ्यू मॅटनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात आमिर खान आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटासाठी 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तर या चित्रपटाने 38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.