'इंग्रजी वृत्तपत्रांना जास्त भाव, मराठीला कमी! हा भेदभाव...'; मराठीच्या मुद्द्यावरून हृषिकेश जोशीचा संताप

Hrishikesh Joshi on Marathi Mudda:  सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृषिकेश जोशी यांच्या एका वक्तव्याची. मराठी भाषेबद्दल अजूनही उदासीनता दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 'तीन अडकून सीताराम' हा त्यांचा चित्रपट चर्चेत आहे, त्याच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 8, 2023, 02:02 PM IST
'इंग्रजी वृत्तपत्रांना जास्त भाव, मराठीला कमी! हा भेदभाव...'; मराठीच्या मुद्द्यावरून हृषिकेश जोशीचा संताप title=
marathi language still ignored says hrishikesh joshi while promoting tin adkun sitaram movie

Hrishikesh Joshi on Marathi Mudda: मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाही. त्यासाठी अनेकदा चित्रपट निर्मात्यांना फार कष्ट घ्यावे लागतात अशी अनेकदा चर्चा रंगलेली असते. मराठी चित्रपट हा आज 100 कोटींच्या घरात कमाई करतो आहे हे चित्रपट एकीकडे सुखावणारं असलं तरीसुद्धा मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शोज, मल्टिप्लेक्सचे शोज मिळत नाही असा सूर अनेकदा ऐकायला मिळतो. या प्रश्नावर अनेकदा मराठी कलाकार हे व्यक्तही होताना दिसतात. त्यावर परोपरीनं चर्चा, विचारविनिमय आणि कृतीही केली जाते परंतु याकडे अजूनही दुर्लेक्ष होते आहे हे मराठी कलाकार जेव्हा वारंवार आवाज उठवतात तेव्हा हे प्रकर्षानं जाणवते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मराठीच्या मुद्द्यावरूनही अनेकदा चर्चा होताना दिसतात. मराठी भाषेला फार कमी दर्जा मिळतो यावरही आवाज उठवला जातो. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता चिन्मय मांडलेकर, हृषिकेश जोशी, सुमीत राघवन अनेकदा यावर बोलताना दिसतात. 

सध्या अभिनेते हृषिकेश जोशी यानंही यावरील आपली नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं खंत व्यक्त केली आहे. हृषिकेश जोशी म्हणाले की, घरातली रद्दी घेताना रद्दीवालाही भेदभाव करतो. इंग्रजी वर्तमानपत्रं-पुस्तकं यांना जास्त भाव मिळतो. तर मराठीला मात्र कमी. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील मात्र सगळ्या रद्दीला एकच भाव दे, रद्दीतही तू काय मला सांगतोस. मी दोन रूपयांनी स्वस्त आहे म्हणून? असे ते रद्दीवाल्याला सुनावतात. 

त्यांनी हीच तुलना चित्रपट वितरकांशी केली असे कळून येते. यापुढे ते म्हणाले की, ''मराठी चित्रपटांना कमी भाडं मिळतं तर गुजराती अथवा इंग्रजी चित्रपटांना दास्त भाडं मिळते. तेव्हा अशावेळी कोणीही अधिक भाडे देणाऱ्यांनाच प्राधान्य देणार. मग येथे मराठीचे नुकसान कोणी केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

मराठीच्या बाबतीत अजूनही उदासीनता : 

याच मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, दाक्षिणात्त्य चित्रपट किती चांगले चालतात, याचे नेहमी दाखले दिले जाता. कारण तेथील प्रेक्षक हे दाक्षिणात्त्य चित्रपटांना प्रथम प्राधान्य देता. मुंबईत अनेकदा दाक्षिणात्त्य चित्रपटांचे सकाळचेही शो हे हाऊसफुल्ल असतात, असा अनुभव आहे. मातृभाषेबद्दल असा अभिमान वाटला तर अनेक प्रश्न सुटतील, असंही यावेळी हृषिकेश जोशी म्हणाले. प्राजक्ता माळी, अलोक राजवाडे, हृषिकेश जोशी यांचा 'तीन अडकून सीताराम' या चित्रटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.