जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...

Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...

दिक्षा पाटील | Updated: Apr 6, 2024, 01:36 PM IST
जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट... title=
(Photo Credit : Social Media)

Navya Naveli Nanda on Wedding : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या 'व्हाट द हेल नव्या' या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीजनचा फिनाले येतोय. गेल्या सीझनप्रमाणे या सीझनमध्ये देखील नव्या नवेली नंदा ही तिची आई श्वेता बच्चन नंदा आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत दिसली. तर यावेळी नव्यानं त्यांना बेस्टफ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न विचारला...

पॉडकास्ट शो 'व्हाट द हेल नव्या' मध्ये श्वेता बच्चन, जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा प्रत्येक विषयावर स्पष्टपणे वक्तव्य करताना दिसली. नव्यानं जया आणि श्वेता या दोघांना प्रश्न विचारला की "बेस्टफ्रेंडशी लग्न करण्याचा निर्णय योग्य असतो का?" यावर जया बच्चन उत्तर देत म्हणाल्या, "हो." तर नव्या म्हणाली "मैत्रीत रोमान्स आणणं योग्य असतं का?" तर जया म्हणाल्या, "लग्नानंतर रोमान्स खिडकीच्या बाहेर जातो." नव्या परत विचारते की "दोन लोकं जर चांगले मित्र आहेत, तर त्यांनी रोमॅन्टिकली एकत्र येणं योग्य आहे का?" यावर श्वेता उत्तर देत म्हणाली की "तुला असं म्हणायचं आहे का की मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी फिलिंग्स असतील तर त्याला पुढे घेऊन जायला हवं का? तर मला वाटतं की घेऊन जायला हवं... कारण एकच तर आयुष्य आहे, ते पण छोटं." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे नव्या म्हणाली, "यानं मग मैत्रीचं नातं खराब होण्याची शक्यता असते. त्यावर श्वेता म्हणाली, नातं तर असही खराब होतं जेव्हा तुम्ही तुमच्या भावना त्यांना सांगतात. जर एकाला त्या भावना आहेत आणि एकाला नाही. तर नात तिथेच खराब झालं आहे. जर मैत्री खूप चांगली असेल तर त्यानंतर जवळीक वाढू शकते. म्हणजेच नातं खराब झालं असल तरी मैत्री टिकून राहते. जर तुमच्यात चांगली मैत्रीच नसेल तर भावना सांगून काही फायदा नाही." 

हेही वाचा : 48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या

श्वेता बच्चन पुढे म्हणाली की "मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे वेगवेगळे रुप पाहायला मिळतात. अशी बाजू पाहायला मिळते जी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि त्या गोष्टींना तुम्हाला स्वीकारावं लागतं."