बोल्ड लूकमध्ये मुंबईच्या रस्त्यावर दिसली पूनम पांडे, फोटो व्हायररल

पूनम पांडे तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते

Updated: Jan 8, 2022, 05:44 PM IST
 बोल्ड लूकमध्ये मुंबईच्या रस्त्यावर दिसली पूनम पांडे, फोटो व्हायररल title=

मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिची स्टायलिश स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. पण कधी-कधी तिच्या बोल्ड लूकमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. मात्र, तिने त्याची कधीच पर्वा केली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पूनम पांडे मुंबईच्या रस्त्यावर बोल्ड स्टाईलमध्ये फिरताना दिसली आहे.

हॉट लूकमध्ये पूनम पांडे स्पॉट
पूनमचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स आणि पांढरा क्रॉप टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पांढरे शूज आणि मॅचिंग स्लिंग बॅग कॅरी केली आहे. यादरम्यान पूनमने तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली आणि पापाराझींना अनेक पोजही दिल्या. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी केलं ट्रोल 
पूनमच्या या बोल्ड लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तर काही यूजर्सनी तिला ट्रोलही करायला सुरुवात केली आहे. यावर कमेंट करत एका युजर्सने लिहिलं की, 'ही गरीब कुठून आली?', तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'भारतात अजूनही गरीबी आहेत का?' काही लोकांनी तिला 'सस्ता मिया खलीफा' असंही म्हटलं आहे. अशा अनेक कमेंट पूनमच्या फोटोंवर करत आहेत.